शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शाहू महाराज विचार दिंडीला उदंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:24 IST

राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे कोल्हापुरात ‘शाहूमय’ वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘शाहू महाराज विचार दिंडी’ काढण्यात आली.

ठळक मुद्दे शाहू समाधी स्मारक लोकार्पण सोहळादीड हजारपेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधिस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यामुळे कोल्हापुरात ‘शाहूमय’ वातावरण निर्माण झाले आहे. सोहळ्यानिमित्त शनिवारी शहरातील प्रमुख मार्गावरून ‘शाहू महाराज विचार दिंडी’ काढण्यात आली.

या दिंडीमध्ये शहरातील महापालिकेच्या तसेच खासगी शाळेतील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेले झांज पथक, लेझीम, मर्दानी खेळ, कुस्ती, मल्लखांबच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.कोल्हापूरकरांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून शाहू समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी याचाच एक भाग म्हणून शहरातून शाहू महाराज विचार दिंडी काढण्यात आली.

बिंदू चौक येथे सकाळी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, समिती सदस्य वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थित होती. यानंतर दिंडी बिंदू चौक, लक्ष्मीपुरी येथील आईसाहेब महाराज पुतळा, ऐतिहासिक दसरा चौक मार्गे राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक स्थळ येथे आली.

दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना कोल्हापूर हॉटेल मालक संघाने अल्पोपहाराचे वाटप केले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, समिती सदस्य इंद्रजित सावंत, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, जय पटकारे, तौफीक मुल्लाणी, दिलीप देसाई, राजेश लाटकर, रियाज सुभेदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, अशोक पोवार, रमेश मोरे, आदी उपस्थित होते.आयुक्त खेळले लेझीमसमाधिस्थळी लेझीम खेळत आलेल्या शालेय मुलांच्या दिंडीत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनीही सहभाग घेतला. त्यांनी लेझीम खेळत आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, राजेश लाटकर, कादर मलबारी, गणी आजरेकर यांनीही सहभाग घेतला.समाज सुधारकांच्या वेशभूषेत बालचमूप्राथामिक शाळेतील शेकडो विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्यासह स्वामी विवेकानंद, महात्मा जोतिबा फुले, सवित्रीबाई फुले, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा महाराज, अशा समाजसुधारकांच्या वेशभूषेतील बालचमू दिंडीचे विशेष आकर्षण ठरले.

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर