शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेत ‘सत्तारूढ’चे वर्चस्व

By admin | Updated: March 24, 2015 00:14 IST

१५ पैकी १४ जागा जिंकल्या : रवींद्र पंदारे यांचा करिश्मा

कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-आॅप. बॅँकेत पंचवार्षिक निवडणुकीत रवींद्र वसंतराव पंदारे यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू ’ सत्तारूढ पॅनेलने १५ पैकी १४ जागा जिंकत बॅँकेवरील वर्चस्व कायम राखले. एका जागेवर विरोधी ‘स्वाभिमानी’ पॅनेलचे प्रमुख बाळासाहेब घुणकीकर हे विजयी झाले. ‘सत्तारूढ’चे नेते रवींद्र पंदारे यांनी आपल्या नेतृत्वाचा करिश्मा कायम राखला. माजी अध्यक्ष विश्र्वासराव माने यांच्या पॅनेलला मतदारांनी धुळ चारली.कोल्हापूरसह सात जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बॅँकेसाठी तिरंगी लढत झाली. पंदारे यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू सत्तारूढ’, बाळासाहेब घुणकीकर, राजन देसाई यांच्या नेतृत्वाखालील ‘स्वाभिमानी परिवर्तन’ व विश्वासराव माने यांच्या नेतृत्वाखालील ‘आदर्श पॅनेल’ यांच्यात लढत झाली. रविवारी १५ जागांसाठी ४६.९० टक्के मतदान झाले. तिन्ही पॅनेलने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस राहिली; पण जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढण्यात सर्वच उमेदवार अपयशी ठरले. सोमवारी रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी झाली. दहा जागी सुरुवातीपासून सत्तारूढने वर्चस्व राखले.भटक्या विमुक्त गटातील ‘स्वाभिमानी’चे नेते बाळासाहेब घुणकीकर वगळता राखीव गटात ‘सत्तारूढ’चे उमेदवार आघाडीवर होते. घुणकीकर यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी महादेव लांडगे यांचा १६८ मतांनी पराभव केला. (प्रतिनिधी)सत्तारूढ पॅनेल, कंसात मते सर्वसाधारण गट- शशिकांत तिवले (४६६९), रवींद्र पंदारे (४५२७), रमेश घाटगे (४०५६), भरत पाटील (४००४), मधुकर पाटील (३९६५), प्रकाश पाटील (३९२३), राजेंद्र चव्हाण उर्फ बन्नाशेठ (३८७२), अतुल जाधव (३८६५), विलासराव कुरणे (३७४४), राजेंद्र पाटील (३६५५). महिला राखीव- हेमा पाटील (४०१७), नेहा कापरे (३७२५). इतर मागासवर्गीय - संजय सुतार (३५३८). अनुसूचित जाती/जमाती- जयदीप कांबळे (३९५५).‘स्वाभिमानी’ पॅनेल : भटक्या जाती/ विमुक्त जमाती - बाळासाहेब घुणकीकर (४०४४) संस्थेचे कार्यक्षेत्र : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग .पाच वर्षांत सभासदांसाठी केलेल्या कामाची पोहोचपावती मिळाली. सभासदांना दिलेला वचननाम्यानुसार काम करू.- रवींद्र पंदारे, राजर्षी शाहू सत्तारूढ पॅनेल प्रमुख.