शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बुलंद आवाजाचे शाहीर राजाराम जगताप यांचे वार्धक्याने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:41 IST

बुलंद आवाजाने शाहीरी परंपरा कायम राखणारे इचलकरंजी येथील ज्येष्ठ शाहीर राजाराम सखाराम जगताप यांचे आज सकाळी वार्धक्याने निधन झाले.

ठळक मुद्देशाहीर राजाराम जगताप यांचे वार्धक्याने निधनशाहिरी क्षेत्रात ५0 वर्षाहून अधिक काळ गाजवला.

कोल्हापूर/इचलकरंजी : बुलंद आवाजाने शाहीरी परंपरा कायम राखणारे इचलकरंजी येथील ज्येष्ठ शाहीर राजाराम सखाराम जगताप यांचे आज सकाळी वार्धक्याने निधन झाले.शाहिरी क्षेत्रात कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण करणारे म्हणून जगताप यांना ओळखले जाते. उत्कृष्ट वक्तृत्व आणि खडा आवाज याच्या जोरावर त्यांनी ५0 वर्षाहून अधिक काळ गाजवला.४ मार्च १९३0 रोजी शाहीरांचा जन्म एका गरीब शेतकरी कुटूंबात झाला. वडील सखाराम जगताप नामांकित पहिलवान होते. त्यांच्यासोबत त्यांचे चुलते गंगाराम जगताप शाहीरीचे कार्यक्रम करत. त्यांच्यामुळेच शाहीरी क्षेत्रात राजाराम जगताप यांचा प्रवेश झाला.

फक्त चौथीपर्र्यत शिक्षण झालेल्या राजाराम यांच्या काव्यप्रतिभा पाहून अनेकजण आश्चर्याने थक्क झाले. महाराष्ट्र, कर्नाटक, कानपूर, अमृतसर अशा अनेक ठिकाणी त्यांनी शाहीरी कला सादर केली. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, मोहन धारिया, वसंतदादा पाटील यांच्यासमोर त्यांनी आपली कला सादर केली.कोल्हापूर जिल्हा परिषद, इचलकरंजी नगरपालिका, रोटरी क्लब, लायन्स क्लब यासारख्या संस्थेकडून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ज्येष्ठ शाहीर कृष्णराव साबळे यांच्याहस्ते त्यांचा इचलकरंजीत सत्कार झाला होता. महाराष्ट्र सरकारतर्फे उत्कृष्ट शाहीर पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर