शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सांगलीचा नितीन कोळी सीमेवर लढताना शहीद

By admin | Updated: October 30, 2016 00:55 IST

दुधगाववर शोककळा : दिवाळी साजरी न करण्याचा गावाचा निर्णय -पुण्यात आज पार्थिव

सांगली/दुधगाव : दुधगाव (ता. मिरज) येथील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान नितीन सुभाष कोळी (वय २८) जम्मू-काश्मीरमध्ये कुपवाडाजवळील मच्छली सेक्टर येथे शुक्रवारी मध्यरात्री शहीद झाले. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. ते शहीद झाल्याचे वृत्त समजताच दुधगाववर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आणि दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.नितीन कोळी यांच्या पश्चात आई सुमन, वडील सुभाष, भाऊ उल्हास, पत्नी संपदा, मुले देवराज व युवराज असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव विमानाने रविवारी दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव या त्यांच्या जन्मगावी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. नितीन कोळी यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. २००८ मध्ये ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते.शुक्रवारी ते सहकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाजवळील मच्छली सेक्टरजवळ कर्तव्य बजावत होते. रात्री साडेनऊ वाजता पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार सुरू झाला. यावेळी झालेल्या चकमकीत कोळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. उपचार सुरू असताना मध्यरात्री अडीच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कोळी शहीद झाल्याचे वृत्त शनिवारी सकाळी गावात येऊन धडकले. त्यांच्या कुटुंबास बऱ्याच वेळानंतर माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ शोकसभा घेऊन कोळी यांना आदरांजली वाहिली. गावात दिवाळी साजरी करायची नाही तसेच कोणीही फटाके फोडायचे नाहीत, असा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा आडमुठे, उपसरपंच संजय देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद आवटी, विश्वास कोळी, विलास आवटी उपस्थित होते. घरावर लावण्यात आलेले आकाशदिवे ग्रामस्थांनी स्वत:हून काढले. गावातील प्रमुख कर्मवीर चौकासह सर्वत्र दिवसभर शुकशुकाट होता. कोळी यांचे पार्थिव रविवारी पुण्यात आणण्यात येणार आहे. तेथून दुधगाव येथे आणले जाणार आहे. (प्रतिनिधी)कुटुंबाचा आधार हरपलाकुटुंबाचा आधार हरपलाशहीद जवान नितीन कोळी यांचे वडील सुभाष कोळी म्हणाले की, लहानपणापासून नितीनची सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आमची घरची परिस्थिती बेताचीच होती, तरीही मी कष्ट करून नितीनला शिकविले. सैन्यात भरती होण्यासाठी त्याला आम्ही पाठबळ दिले. भरती होण्यासाठी त्यानेही खूप कष्ट केले. त्याच्या कष्टाला यश मिळाले. आठ वर्षांपूर्वी तो भरती झाला. तो शहीद झाल्याने कुटुंबाचा आधार गेला असून, फार मोठे नुकसान झाले आहे. ते कधीही न भरूनयेणारे आहे.\पत्नीशी चार दिवसांपूर्वीच मोबाईलवर संपर्कनितीन कोळी यांनी चार दिवसांपूर्वी पत्नी संपदा यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून कुटुंबाची विचारपूस केली होती. ५ नोव्हेंबरला गावी सुटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले, पण शुक्रवारी रात्री गोळीबारात ते शहीद झाले. पत्नीशी मोबाईलवर बोलल्यानंतर काही दिवसांतच ते शहीद झाल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. शनिवारी दुपारपर्यंत घरी वडील व भावालाच ते शहीद झाल्याचे माहीत होते.मे महिन्यात सुटीलानितीन कोळी मे महिन्यात गावाकडे सुटीला आले होते. नवरात्रौत्सवात ब्रह्मनाथ कल्चरल ग्रुपतर्फे गावातील सैन्य दलात असलेल्या जवानांचा सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळी ३२ जवान सुटीसाठी गावाकडे आले होते. या सर्वांचा सत्कार केला होता, पण या कार्यक्रमास कोळी यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी संपदा यांचा सत्कार करण्यात आला होता.घराजवळ शुकशुकाटदुधगावातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकालगत कोळी यांचे घर आहे. शनिवारी दुपारी घराजवळ शुकशुकाट होता. पत्नी व आईला ते शहीद झाल्याचे सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे घराचे लोखंडी गेटही बंद केले होते. शेजारील चार-पाच ग्रामस्थ तेथे बसून होते. कोळी यांची मुले देवराज (वय चार) आणि युवराज (वय दोन) घरातच होती.