शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद भगतसिंग मंडळाची ‘सिस्टीम’ जप्त १५ कार्यकर्त्यांवर गुन्हे : अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांसह सिस्टीममालकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:15 IST

शहरातील महाद्वार रोडवर गणेश आगमन मिरवणुकीत सोमवारी नियमबाह्यपणे साउंड सिस्टीम लावणाऱ्या जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, साउंड सिस्टीम मालकासह मंडळांच्या १५ कार्यकर्त्यांवर

कोल्हापूर : शहरातील महाद्वार रोडवर गणेश आगमन मिरवणुकीत सोमवारी नियमबाह्यपणे साउंड सिस्टीम लावणाऱ्या जुना बुधवार पेठेतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, साउंड सिस्टीम मालकासह मंडळांच्या १५ कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. १०) रात्री गुन्हे दाखल केले. तसेच साउंड सिस्टीम जप्त केली. संबंधित मंडळावर कठोर कारवाईसाठी मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दोन दिवसांत सादर केले जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठका घेऊन, नियम डावलून साउंड सिस्टीम लावणाºया तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलीस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला तशी लेखी नोटीसही बजावली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची ध्वनिमर्यादा मंडळांना घालून दिली. तसेच साउंड सिस्टीम लावल्याने मानवी आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामांबद्दल प्रबोधनही केले होते; परंतु जुना बुधवार पेठ येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाने सोमवारी रात्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीत पोलिसांचे आदेश धुडकावून साउंड सिस्टीम लावून ध्वनिप्रदूषण केले. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी या मार्गावर मिरवणूक रेंगाळून रहदारीस अडथळा झाला.

पोलिसांनी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना समज दिली असतानाही त्यांनी मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम लावून नाचकाम केले. पोलिसांनी मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण केले. तसेच ध्वनिक्षेपक मापन यंत्रांद्वारे आवाजाची मर्यादा तपासली. साउंड सिस्टीम जप्त करून मंडळांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. साउंड सिस्टीम मालक मुनीर ऊर्फ मुन्ना ऐनुद्दीन मुल्ला (वय ४५, रा. बुरुड गल्ली, शनिवार पेठ) यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यांचे ध्वनियंत्रणेचे सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.ध्वनिमुक्त गणेशोत्सवाचा आनंद घ्यावागुन्हे दाखल झालेल्या मंडळांच्या पदाधिकाºयांना पारपत्र, शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये हजर होताना अडचणी निर्माण होऊन त्यांच्या भवितव्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे साउंड सिस्टीमचा हट्ट कोणी धरू नये, गणेशभक्तांनी ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेशोत्सव