शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

शहरभान कॉलम-०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST

शहरभान आर्कि. जीवन बोडके कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, ...

शहरभान

आर्कि. जीवन बोडके

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. निवडणूक आघाड्या मोर्चेबांधणी, सत्ता समीकरणे, अमक्याची ताकद, तमक्याची ताकद यांची नेहमीचीच साचेबध्द मांडणी सुरू झाली आहे. ही निवडणूक, त्याच त्या साचेबध्द राजकारणातून बाहेर पडून शहराला नवा विचार, नवी दिशा देणारी व्हावी, यासाठी शहरभान या नावाने एक सजग चळवळ आकार घेऊ लागली आहे. त्यातून पारंपरिक ढाच्यातून बाहेर काढून जबाबदार लोकप्रतिनिधित्व आकारास यावे, असा प्रयत्न सुरू झाला आहे. या चळवळीमागील भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न...

‘शहर’ हे माणसाने निर्माण केलेले विश्व आहे. ‘शहरे’ एकमेकांबरोबर जुळवून घेऊन सलोख्याने जगायला शिकवतात. शहरी जीवन हे परस्परावलंबी असते. शहरी जीवनात सहिष्णुता, सहनशीलता एकमेकांबाबत आदर हे गुण अंगी बाणवावे लागतात. शहरे लोकशाहीस चालना देणारी असतात. लोकशाही संकल्पनेचा पाया शहरांनीच घातला आहे. शहरातील संस्कृती बहुभाषिक, बहुधार्मिक असते. शहरामध्ये वेगवेगळे आचार-विचार, वेगवेगळ्या खाद्य संस्कृती एकत्र नांदत असतात. शहरात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय एकमेकांच्या साहाय्यानेच भरभराटीला येत असतात.

शहरांचे वाढते आकार आणि वाढती लोकसंख्या ही शहरांना लोकांनी दिलेली पसंती दर्शवतात. शहरांच्या विस्ताराला आवर घालणे आजवर कोणालाही जमलेले नाही. येणाऱ्या काळात जमेल असेही वाटत नाही. वाढत्या लोकसंख्येचा आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, शहरीकरण अटळ आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि त्यामुळे ते समजून घेण्यात शहाणपण आहे.

शहर नियोजन आणि शहर विकास ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हा गुंता समजून घेऊ शकतील, त्याची उत्तरे शोधू शकतील अशा कल्पक, बुद्धिमान आणि ध्येयनिष्ठ नगरसेवकांची शहरांना गरज आहे. नागरी जीवनाची गुणवत्ता आणि नागरी नेतृत्वाची कल्पकता, यांचा जवळचा संबंध आहे. ‘नगरसेवक, दैनंदिन नागरी जीवनाच्या समस्यांकडे मुकादमाच्या क्षमतेने सोडवू शकतो, की प्रशासकाच्या क्षमतेने सोडवू शकतो?’ हा एक महत्त्वाचा विचार नगरसेवक निवडताना नागरिकांनी करणे गरजेचे आहे. मुकादम हवाय की शहराचा धोरणकर्ता हवाय? नागरी नेतृत्व निवडण्याबाबत आवश्यक ती प्रगल्भता आपल्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये आहे असे वाटत नाही. सक्षम, ध्येयनिष्ठ मनुष्यबळ प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. पण सत्तेच्या, बडेजावाच्या दांडगाव्यापुढे ते परिघाबाहेरच घुटमळत राहिले आहे. त्यात आपल्या निवडणूक पद्धतीने सततची अस्थिरता निर्माण करून गोंधळात आणखी भर घातली आहे. नागरी जीवनाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या चळवळींना दोन्ही आघाड्यांवर काम करावे लागणार आहे.

१) सामाजिक प्रबोधन आणि २) कायद्यात बदल.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने काही विषय ऐरणीवर घेता येतील. नागरी समाज म्हणजे काय? नगरपालिका, महानगरपालिका, या संस्था नेमक्या काय? आहेत? या संस्था कोण चालवू शकते? या संस्था चालवणाऱ्यांची क्षमता आणि नागरी जीवनाची गुणवत्ता यांचा काही संबंध आहे की नाही? या संस्थात विधायक आणि उन्नतीचे राजकारण अशक्य आहे का? गुंड-पुंड, ऐरे-गैरे यांना नेतृत्व करण्याएवढा आत्मविश्वास कशामुळे आला? आरक्षणाची तरतूद, त्यासाठी आलटून पालटून राखीव प्रभाग, यामुळे शहरांना स्थिर, ध्येयनिष्ठ नेतृत्व लाभू शकेल का? भारतीय नागरी समाजाची मानसिकता, ७४ व्या घटना दुरुस्तीची गरज, आणि वास्तव, असे किती तरी विषय या निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर घेण्यासारखे आहेत.

(लेखक कोल्हापुरातील ज्येष्ठ आर्किटेक्ट व पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत)

(फोटो ग्रंथालयात आहे तो वापरावा)