शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: June 14, 2016 00:47 IST

पोलिसांची कारवाई : तीन तरुणींसह दलाल, रिक्षाचालकास अटक

कोल्हापूर : कळंबा-वाशीनाका ते आपटेनगर रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास वेश्या व्यवसायासाठी तिघा तरुणींना रिक्षातून घेऊन जाणाऱ्या दलालासह रिक्षाचालकास शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले. संशयित आरोपी दलाल राजू बाबूराव चव्हाण (वय ४६, रा. महादेव मंदिराशेजारी, आपटेनगर), रिक्षाचालक चंद्रकांत लक्ष्मण शिंदे (४२, रा. राजोपाध्येनगर) अशी त्यांची नावे आहेत. पीडित तरुणींमध्ये एक मुंबईची व दोन स्थानिक आहेत. त्यांच्याकडून रिक्षा, तीन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राजू चव्हाण हा सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कळंबा-वाशी नाका रोडवर पाळत ठेवली असता चव्हाण हा रिक्षातून तीन तरुणींना घेऊन जाताना दिसला. यावेळी राणे यांच्या पथकाने रिक्षाचा पाठलाग करून त्यांना रंगेहात पकडले. संशयित चव्हाण याच्याकडे चौकशी केली असता त्याने सेक्स रॅकेट चालवीत असल्याची कबुली दिली. तिघा पीडित तरुणींसह दोघांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आणले. चव्हाण हा अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवीत आहे. त्याच्यावर जुना राजवाडा, करवीर पोलिस ठाण्यांत यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. राजू चव्हाण याच्या घरामध्ये मुंबईतील २६ वर्षांची तरुणी राहत होती. अन्य दोघी तरुणी स्थानिक असल्याने त्या दिवसभर वेश्या व्यवसाय करून रात्री आपल्या घरी जात होत्या. त्यांच्याकडे येणाऱ्या गिऱ्हाइकांकडून चव्हाण हा दोन हजार रुपये घेत होता. त्यांतील पाचशे रुपये तरुणीला देऊन त्यांना गिऱ्हाइकाच्या स्वाधीन करीत असे. तेथून गिऱ्हाईक तिला स्वत:च्या घरी किंवा लॉजवर घेऊन जात असे. चव्हाण हा फोनवरून तरुणींशी व गिऱ्हाइकांशी संपर्क साधत असे.तरुणींचा आक्रोश -पीडित तरुणींना लक्ष्मीपुरीच्या महिला पोलिस कक्षामध्ये बसविले होते. त्यांच्याकडून महिला पोलिस अधिकारी माहिती घेत होत्या. यावेळी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार समोर दिसताच त्यांना रडू कोसळले.