शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

घरफाळा घोटाळ्यात आणखी सात अधिकारी, भूपाल शेटे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:21 IST

घरफाळा घोटाळा प्रकरणात आणखी सात अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले यांनी पूर्वीच्या अहवालामध्ये ही नावे लपविली याबद्दल त्यांच्याकडून कर निर्धारक पदाचा कार्यभार काढून घेऊन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ठळक मुद्दे घरफाळा घोटाळ्यात आणखी सात अधिकारी, भूपाल शेटे यांचा दावासिस्टीम मॅनेजरच्या अहवालातून स्पष्ट

कोल्हापूर : घरफाळा घोटाळा प्रकरणात आणखी सात अधिकारी व कर्मचारी असल्याची माहिती ज्येष्ठ नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले यांनी पूर्वीच्या अहवालामध्ये ही नावे लपविली याबद्दल त्यांच्याकडून कर निर्धारक पदाचा कार्यभार काढून घेऊन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.शेटे म्हणाले, घरफाळा घोटाळ्यामध्ये एकूण २० प्रकरणांची चौकशी समितीने फेरचौकशी करून आयुक्त यांच्याकडे मंगळवारी अहवाल दिला आहे. या अहवालामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सिस्टीम मॅनेजर यांचा सर्व प्रकरणांच्या संगणकीय अहवालाचाही समावेश आहे.

ज्यामध्ये असेसमेंट, असेसमेंट डिटेल्स, डिमांड डिटेल्स, कलेक्शन डिटेल्स व मिळकतींची नोंद अंतिम करण्यात आलेले युजर आयडी वापरलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव, ऑथोराइज करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्याचा पासवर्ड यांचा समावेश आहे.यामध्ये पूर्वीचे चार कर्मचारी व सध्याचे या अहवालातील सात कर्मचारी अशा एकूण ११ कर्मचारी व अधिकारी या प्रकरणात सामील असल्याबाबतचा अहवाल आहे. संजय भोसले यांनी दिलेल्या अहवालात ही माहिती आयुक्तांपासून लपविली असल्याचे या संगणकीय अहवालावरून सिद्ध झाले आहे. यापूर्वी संजय भोसले यांनी जो घरफाळा चौकशीचा बोगस व बनावट अहवाल स्वत: तयार करून फक्त चार कर्मचारी यांना दोषी ठरवून आयुक्त यांची फसवणूक केली आहे.त्यांना दिलेला तीन कोटी 18 लाख इतक्या रकमेचा घरफाळा अहवाल चुकीचा असल्याचे या संगणकीय अहवालानुसार सिद्ध झाले आहे. काही मिळकतधारकांनी धनादेशाने घरफळा जमा केला असताना भोसले यांनी अहवालात दाखवलेले नाही. उलट या करदात्यांवर या भरलेल्या रकमेवर दंडासह बोगस रक्कम येणे दाखविली.

संगणकीय अहवालामध्ये भरलेल्या रकमा जमा असलेचे सिस्टीम मॅनेजर यांनी नमूद केलेले आहे. त्यामुळे ही रक्कम सूडबुद्धीने दिवाकर कारंडे व इतर कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी बोगस दाखविली. त्याप्रमाणे संजय भोसले यांनी आपल्या कारकिर्दीतील २००९ पासून ते २०१३ पर्यंत महापालिकेचे भाडेवाढीनुसार नुकसान झाले आहे. त्यांचीही बनावटगिरी संगणकीय अहवालामध्ये दिसून आली आहे.सिस्टीम मॅनेजरवरही कारवाई करासंजय भोसले यांचा कार्यकाल २००९ ते २०१३ ची माहिती मागणी करूनही सिस्टीम मॅनेजर यांनी अजूनही दिलेली नाही. याच १४ प्रकरणांपैकी अजून पाच प्रकरणांमध्ये संजय भोसले यांचा सहभाग आहे. म्हणूनच सिस्टीम मॅनेजर ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत सिस्टीम मॅनेजर यांच्यावरदेखील फौजदारी कारवाई करावी, अशी नगरसेवक भूपाल शेटे यांनी मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका