शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मदन नाईक खूनप्रकरणी एसआयटीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:00 IST

कोल्हापूर : ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे जावई आणि उद्योजक मदन वसंतराव नाईक (वय ६९, रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) ...

कोल्हापूर : ‘स्वामी’कार रणजित देसाई यांचे जावई आणि उद्योजक मदन वसंतराव नाईक (वय ६९, रा. मुक्त सैनिक वसाहत, कोल्हापूर) यांच्या खूनप्रकरणी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करून तपास करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोल्हापूर पोलिसांना दिले.नाईक यांच्या पत्नी पारू नाईक, मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी सावंत आणि ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तातडीने तपासाची मागणी केली होती.कारदगा (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील रेंदाळ-कारदगा रस्त्यावर २५ जानेवारी २०१९ रोजी मदन नाईक यांचा मृतदेह आढळला होता. अज्ञातांनी त्यांच्या डोक्यात वर्मी घाव घालून खून करून हात-पाय बांधून मृतदेह उसाच्या शेतात टाकून दिला होता. याप्रकरणी कर्नाटकातील सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अद्यापही येथील पोलिसांच्या हाती ठोस पुरावे नाहीत.नाईक यांचे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील शेताकडे जाणे-येणे होते. २१ जानेवारी २०१९ रोजी ते या मार्गावरून बेपत्ता झाले. मोबाईल कॉल डिटेल्स, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. तीन आठवड्यांच्या तपासामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. कोल्हापूर पोलिसांची पाच पथके या तपासावर लक्ष ठेवून आहेत. तरीही अजूनही पोलीस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. म्हणूनच त्यांच्या पत्नी पारू नाईक यांनी फडणवीस यांची भेट घेतली.