शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या धर्तीवर अग्निशमन दल स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:39 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गडहिंग्लज विभागातील प्रत्येक तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ...

ठळक मुद्देसंध्यादेवी कुपेकर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडहिंग्लज विभागासाठी मागणी

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमन दलाची पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे गडहिंग्लज विभागातील प्रत्येक तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सुसज्ज अग्निशमन दलाची स्थापना करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी खास पत्रातून केली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली.

आगीच्या घटनेतील नुकसान म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान असल्यामुळे यासंदर्भात सकारात्मक निर्णयाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज नगरपालिकेचे अग्निशमन केंद्र वगळता आजरा व चंदगड तालुक्यांत अग्निशमनची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे नजीकच्या संकेश्वर व निपाणी येथून अग्निशमन यंत्रणेला पाचारण करावे लागते. त्यास विलंब लागत असल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीच्या घटना वारंवार घडत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी औरनाळ येथील आगीत पाटीलवाड्याचे सुमारे ४० लाखांचे, तर चार दिवसांपूर्वी बसर्गे येथील आगीत सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तीनही तालुक्यांत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सुसज्ज अग्निशमन केंद्र व दलाची स्थापना करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.अशी आहेत कर्नाटकातील केंद्रे२५ किलोमीटर परिघाच्या अंतरावर प्रत्येक तालुक्याला एक फायर स्टेशन आहे. त्यामध्ये दोन अत्याधुनिक अग्निशमन गाड्या व २५ प्रशिक्षित कर्मचारी आहेत. या केंद्रांवर नियंत्रण करण्यासाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र कार्यालय व अग्निशमन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबरोबरच ६० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे खास आपत्ती निवारण दल स्थापन करण्यात आले आहे. या धर्तीवर अग्निशमन केंद्राची मागणी कुपेकर यांनी केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरministerमंत्री