शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

अंबाबाई देवस्थानसह स्वयंसेवी संस्थांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 17:27 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावहून कोल्हापुरात आलेल्या भाविकांना स्वाइन फ्लूपासून वाचविण्यासाठी देवस्थानचे मिश फॅन, त्यांना उन्हातान्हापासून त्रास झाला तर तातडीने आरोग्य सेवा देणारे प्राथमिक उपचार केंद्र, दर्शनरांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, दर्शनरांगांच्या सुयोग्य नियोजनासाठी देवस्थान समितीसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते दिवसरात्र काम करीत आहेत.

ठळक मुद्देभाविकांच्या काळजीने राबतेय यंत्रणा...स्वाइन फ्लूविरोधी ‘मिश फॅन’दर्शनरांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अंबाबाई मंदिर परिसरात आरोग्य केंद्र

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी परगावहून कोल्हापुरात आलेल्या भाविकांना स्वाइन फ्लूपासून वाचविण्यासाठी देवस्थानचे मिश फॅन, त्यांना उन्हातान्हापासून त्रास झाला तर तातडीने आरोग्य सेवा देणारे प्राथमिक उपचार केंद्र, दर्शनरांगांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, दर्शनरांगांच्या सुयोग्य नियोजनासाठी देवस्थान समितीसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते दिवसरात्र काम करीत आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाºया पावसाने उघडीप दिल्याने आता अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांचा ओघ वाढला आहे. दिवसभरात लाख-दीड लाखाच्या संख्येने येणाºया भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या नवरात्रौत्सव काळात स्वयंस्फूर्तीने राबविणारे शेकडो हात पुढे आले आहेत.

स्वाइन फ्लूविरोधी ‘मिश फॅन’

कोल्हापुरात स्वाइन फ्लूचे अनेक रुग्ण आढळले आहेत. मंदिराच्या आवारात तर भाविकांचे लोंढेच्या लोंढे असतात. त्यांना स्वाइन फ्लूची लागण होऊ नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वाइन फ्लूविरोधी मिश फॅन बसविण्यात आले आहेत. या फॅनच्या यंत्रणेमध्ये प्रतिबंधात्मक औषधाचे दोन थेंब टाकले की फॅनद्वारे हे औषध हवेत पसरते आणि त्याचा प्रभाव पुढे तीन तास राहतो. दर तीन तासांनी हे औषध घातले जात आहे. अंबाबाईचा गाभारा, कासव चौक, दर्शनरांगांमध्ये सहा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अन्नछत्र या पाच ठिकाणी हे फॅन बसविण्यात आले आहेत.

पिण्याचे पाणी

दर्शनरांगांमध्ये थांबलेल्या भाविकांना श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. नागरिक ‘सेवा’ म्हणून हे पाणी रांगांमध्ये पोहोचवीत आहेत. मंदिराच्या परिसरात मनुग्राफ, तर विद्यापीठ गेटसमोर प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या वतीनेही पाण्याची सोय करण्यात आली आहे.

आरोग्य केंद्रभाविकांना गर्दीचा त्रास झाल्यास त्यांना तातडीने प्रथमोपचार मिळावेत, यासाठी अंबाबाई मंदिर परिसरातील उद्यानात अ‍ॅस्टर आधार व व्हाईट आर्मीच्या वतीने प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आले आहे. बाह्य परिसरात अ‍ॅपल हॉस्पिटलने सोय केली आहे. शनिवारी एका वृद्ध भाविकाला उन्हामुळे चक्कर आल्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत अडीचशेहून अधिक भाविकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे.रांगांचे नियोजनभाविकांच्या दर्शनरांगांचे योग्य नियोजन करण्यासाठी व्हाईट आर्मी, जीवनज्योती संस्थेचे जवान आणि अनिरुद्ध बापू सेवाभावी संस्थेचे कार्यकर्त काम करीत आहेत. पहाटेपासून अंबाबाईची पालखी संपल्यानंतरही हे कार्यकर्ते कार्यरत असतात.

राबणाºयांचीही काळजीदेवीला येणाºया भाविकांना सेवा देणाºया आणि रात्रंदिवस राबणाºया सर्व व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांचीही काळजी देवस्थानच्या वतीने घेतली जात आहे. कार्यकर्त्यांसह पोलीस असतील त्या ठिकाणावर त्यांच्यासाठी नाष्टा व जेवणाचे पॅकेट आणि पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. रात्री गर्दी ओसरली की मंदिराच्या परिसरातील अन्नछत्रात जेवणाचीही सोय करण्यात आली आहे.