शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

वीजदरामध्ये ‘यंत्रमाग’ला वेगळी वर्गवारी

By admin | Updated: July 3, 2015 00:55 IST

सुरेश हाळवणकर : डिसेंबर २0१४ पेक्षा वीजदर कमी होणार

इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला वीजदरामध्ये वेगळी वर्गवारी करावी, ही मागणी मान्य करत वीज नियामक आयोगाने यंत्रमाग व्यवसायाला स्वतंत्र वर्गवारी घोषित केली आहे. त्याचबरोबर डिसेंबर २०१४ च्या दरपत्रकानुसार सध्या जाहीर झालेला दर कमी करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.औद्योगिक व्यवसायामध्येच यंत्रमाग व्यवसायाचा समावेश होत असल्याने वेगळ्या वीजदराची योजना राबविता येत नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी करावी, अशी मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा करत ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह बैठक घेऊन वीज नियामक आयोगाच्या पुणे येथे झालेल्या जाहीर सुनावणीवेळी यंत्रमाग क्षेत्रातील सर्व आमदारांच्या एकत्रित सहीचे निवेदन देऊन शासनाने वीज नियामक आयोगाला शिफारस केली. त्यानुसार आयोगाने ही घोषणा केली आहे.तसेच डिसेंबर २०१४ च्या दरामध्ये व आता लागू केलेल्या दरामध्ये वीस किलो वॅट भारपेक्षा कमी असलेल्या ग्राहकांसाठी ७२ पैसे, तर वीस किलो वॅटपेक्षा अधिक भार असणाऱ्या यंत्रमागधारकांना एक रुपये ८७ पैसे दर कमी करण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले आहे. यामुळे यंत्रमागासाठी वीजदरासंदर्भातील विविध योजनाही राबविण्यास सुलभ होणार आहे.