शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ नेते प्रा एन. डी. पाटील यांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 05:45 IST

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा.एन.डी.पाटील (वय ९३) यांची ...

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे आणि लढाऊ नेतृत्व असलेल्या प्रा.एन.डी.पाटील (वय ९३) यांची प्रकृती रविवारी अत्यंत गंभीर बनली. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण त्यांची प्रकृती उपचारास फारसा प्रतिसाद देत नाही. गेली चार दिवसांत त्यांच्या पोटात अन्नपाणी गेलेले नाही.वातावरणात बदल झाल्याने त्यांना थोडी कणकण वाटत होती म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले..पण तिथे गेल्यावर त्यांना लागोपाठ दोनवेळा ब्रेन स्ट्रोक आल्याने बोलणे बंद झाले आहे..डॉक्टर त्यांच्या उपचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत..कोरोणाच्या दुसऱ्या लाटेत  त्यांना बाधा झाली पण या वयातही हा समाजयोद्धा कोरोनाला हरवून सुखरूप घरी आला.. त्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती..गेल्या दीड वर्षांपासून त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याने भेटायला आलेल्या लोकांना ते ओळखत नव्हते..पण तरीही वाचन आणि दैनंदीन जीवन सुरळीत होते. मूळ शरीर धिप्पाड होते त्यामुळे इतर बारीकसारीक आजाराला ते आतापर्यंत कधीच नमले नाहीत.आता मात्र त्यांचे शरीर वयोमानानुसार थकले आहे..आवाजही मलूल झाला होता आणि त्यातच ब्रेन स्ट्रोक्स आल्याने त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे..त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई यांच्यासह सारे कुटुंब आणि चळवळीतील परिवार सरांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करत आहेत..