वाळवे खुर्द (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारलेल्या विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सुमित्रा प्रकाश पाटील होत्या. यावेळी एन. एस. पाटील, तुकाराम बोडके यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास माजी उपसरपंच भरत पाटील, बिद्री साखर कारखान्याचे संचालक जगदिश पाटील संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील, ग्रामसेवक आर. डी. पाटील,अभिषेक पाटील,शामराव मांडवकर,भुजिंगा पाटील,गुंडापा तावडे, विठ्ठल पाटील,जयसिंग शेणवी,ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. आभार तुकाराम बोडके यांनी मानले.
१७ वाळवे खुर्द विरंगुळा केंद्र
फोटो ओळी - वाळवे खुर्द (ता.कागल )येथे विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करताना बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, शेजारी सरपंच संगीता बोडके, तुकाराम बोडके, एन.एस.पाटील व इतर.