शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस अनुदानासाठी ज्येष्ठ नागरिकाचे हेलपाटे, ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 10:47 IST

गॅसचे अनुदान एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जमा होत असल्याने गंगावेश परिसरातील गुरुवार पेठमधील ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दीड वर्ष हेलपाटे मारावे लागावे लागत आहेत. याबाबत शामराव गोपाळ जाधव (वय ७६, सध्या रा. ४६, डी वॉर्ड, कोल्हापूर) यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार केली.

ठळक मुद्देपूर्वीच्याच बँकेत पैसे जमा व्हावेत गंगावेशीतील शामराव जाधव यांची मागणी

कोल्हापूर : गॅसचे अनुदान एका बँकेतून दुसऱ्या बँकेत जमा होत असल्याने गंगावेश परिसरातील गुरुवार पेठमधील ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दीड वर्ष हेलपाटे मारावे लागावे लागत आहेत. याबाबत शामराव गोपाळ जाधव (वय ७६, सध्या रा. ४६, डी वॉर्ड, कोल्हापूर) यांनी ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तक्रार केली.जाधव यांनी सांगितले की, माझे ताराबाई रोडवरील एका सहकारी बँकेत खाते आहे. या खात्यावर गॅसचे अनुदान जमा होत होते; पण १६ आॅगस्ट २०१७ पासून गॅसचे अनुदान दुसऱ्या बँकेत जमा होत आहे. येरवडा कारागृह मुद्रणालय, पुणे येथून निवृत्त झालो आहे. मुलगा पुणे येथे नोकरीस असल्याने कसबा गेट येथील जिरगे बोळ येथे सध्या भाड्याच्या घरात मी व पत्नी असे दोघेच राहतो.

शहरातील एका बँकेत गॅसचे अनुदान जमा होते. ते मला मिळते. परंतु, ये-जा करण्यासाठी एक तर चालत जावे लागते किंवा रिक्षाने जावे लागते. दीडशे रुपयांच्या अनुदानापोटी रिक्षाला ५० रुपये भाडे घालावे लागते. घरापासून सहकारी बँक जवळ असल्याने गॅसचे अनुदान या सहकारी बँकेत पूर्ववत मिळावे, अशी मागणी आहे.याबाबत संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या ठिकाणी आधार कार्ड लिंक होते, त्याच ठिकाणी संबंधितांचे पैसे जमा होतात, अशी व्यवस्था आहे. ज्या व्यक्तीच्या नावे (ग्राहक) नंबर आहे, त्यालाच ते पैसे मिळतात. त्यामुळे जाधव यांना गॅस अनुदान न मिळण्यात गॅस एजन्सीचा दोष नाही.याचबरोबर संबंधित बँकेशी संपर्क साधला असता, जाधव यांनी दोन्ही ठिकाणी गॅस अनुदानाचे पर्याय दिल्याने त्यांचे पैसे बँकेत जमा होतात. त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड आमच्याकडे आणून दिल्यास त्यांचे गॅस अनुदान पूर्ववत त्यांच्या पहिल्या बँकेत जमा होईल, असे बँकेने सांगितले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत