कोल्हापूर : गोवा येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ३७ राष्ट्रीय शॉटगन ट्रॅपशूटिंग स्पर्धेसाठी कोल्हापूरची राजकुंवर प्रणिल इंगळे हीची निवड झाली. तिची ही निवड पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शॉटगन ट्रॅपशूटिंग स्पर्धेतील विशेष कामकागिरीच्या निकषावर करण्यात आली. राजकुंवरने या स्पर्धेत सिंगल व डबल ट्रॅप ज्युनियर व सिनियर वुमन्स या गटाअंतर्गत सुवर्ण मिळवून कोल्हापूरचे नाव राज्य व देश पातळीवर झळकाविले. राजकुंवरला आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक रियान रिझवी यांचे मार्गदर्शन लाभले. तर छत्रपती व मालोजीराजे, मधुरिमाराजे यांचे प्रोत्साहन लाभले.
कोल्हापूरच्या राजकुंवर इंगळे हीची राष्ट्रीय शॉटगन ट्रॅपशूटिंग स्पर्धेसाठी निवड
By सचिन भोसले | Updated: October 20, 2023 17:12 IST