खोची:अशोकराव माने तंत्रनिकेन,वाठार(ता.हातकणंगले)येथील मेकॅनिकल, ऑटोमोबाईल,इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रिकल विभागातील १०६ विद्यार्थ्यांची पुणे येथील यझाकी इंडिया या बहुराष्ट्रीय नामवंत जापनीज कंपनीत निवड झाली. त्यांचा सन्मान संस्था अध्यक्ष विजयसिंह माने व जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांनी केला.
गुणवत्तेचा दर्जा सतत उंचावत जागतिक पातळीवरील अद्ययावत ज्ञान देण्याची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला महत्त्व देण्यात कॉलेज अग्रेसर राहिले आहे. शासकीय नोकरी, नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरीचे स्थान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मागील वर्षी लॉकडाऊन काळातसुद्धा १८१ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली. आद्यपही काही ठिकाणच्या निवडी बाकी आहेत, अशी माहिती अध्यक्ष विजयसिंह माने यांनी यावेळी दिली.
प्राचार्य वाय. आर.गुरव म्हणाले,१२ महाविद्यालयातील २७५ विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीमध्ये सोशल डिस्टनसिंग नियमांचे पालन करून सहभाग घेतला. यामध्ये १७६ विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली. त्यापैकी १०६ विद्यार्थी माने तंत्रनिकेतनचे आहेत.
यावेळी डॉ.अजय मस्के, टीपीओ प्रा.एफ.बी.अमीन,एस.एफ.अमीन,एस.एन.यादव,पी.व्ही.कुंभार,एस.ए.लकडे,पी.ती.हसबे उपस्थित होते.
फोटो ओळी-वाठार येथील अशोकराव माने तंत्रनिकेतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निवडीबद्दल कॉलेजच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.