शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

विक्रमसिंह यांचा पुतळा पाहून भावना अनावर! : राजेचीं हुबेहूब चेहरापट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:29 IST

देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत एक स्वतंत्र संस्थान म्हणून राज्यकारभार पाहत असलेल्या कागल जहाँगिरीचे वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे नातू आणि शाहू ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. दिवसभरात या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी राजेप्रेमींनी येथे हजेरी लावली

ठळक मुद्देशिल्पकार किशोर पुरेकरांवर कौतुकाचा वर्षाव

जहाँगीर शेख ।कागल : देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत एक स्वतंत्र संस्थान म्हणून राज्यकारभार पाहत असलेल्या कागल जहाँगिरीचे वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे नातू आणि शाहू ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण गुरुवारी एका शानदार समारंभात करण्यात आले. दिवसभरात या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी राजेप्रेमींनी येथे हजेरी लावली.चेहऱ्यावरील निर्मळ, निरपेक्ष भाव, त्यांचे ते आंनदमय हास्य, परोपकारी नजर, विशाल भालप्रदेश, केसांची स्टाईल, पुढे आलेली हनुवटी ते दातांची रचना, असे अन्य लहान-मोठे बारकावे शिल्पकाराने अचुकपणे बनविल्याने हा पुतळा राजेसाहेबांच्या चेहरापट्टीची हुबेहूब प्रतिकृती भासतो आहे. विक्रमसिंह घाटगे यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाने हा पुतळा पाहून शिल्पकार किशोर पुरेकर (कोल्हापूर) यांच्यावर, तसेच पुतळा समितीवरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. या पुतळ्याचे दर्शन घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

तीन महिन्यांत हा ब्राँझचा पुतळा बनविला आहे. समरजितसिंह घाटगे यांनी यासाठी पुतळा समिती बनविली. या समीतीत ते स्वत:ही आले नाहीत. विक्रमसिंह घाटगेंच्या समवेत अनेक वर्षे काम केलेले, त्यांचा मित्रपरिवार, तसेच विविध क्षेत्रांतील व्यक्तींना या समितीत स्थान दिले. परिणामी, सुंदर पुतळा आणि स्मारक उभे राहिले आहे.कागलच्या घाटगे ज्युनिअर घराण्यातील मृगेंद्रसिंह घाटगे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. प्रवीणसिंहराजे, वर्षादेवी नाडगोंडे, वीरकुमार पाटील, उदय बागी, जयपाल मांगोरे, सुजयसिंह गायकवाड, रामचंद्र खराडे, बाळ पाटील, शिवाजीराव गाडेकर, लेफ्टनंट कर्नल सय्यद, टी. ए. कांबळे, सुनील मगदूम, आदींचा यात समावेश होता. विक्रमसिंह घाटगे यांचा परिवार आणि या समितीच्या प्रयत्नांतून एक चांगले स्मारक आणि शिल्पकृती कागलमध्ये उभी राहिली आहे.‘त्या’ पंचवीस ते तीस वेळा वर्कशॉपमध्ये....स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या पत्नी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे या पुतळ्याबद्दल खूप भावूक झाल्या होत्या. पुतळा निर्मितीच्या कामात त्यांनी खूप योगदान दिले. गेल्या तीन महिन्यांच्या काळात बापट कॅम्पमधील आमच्या वर्कशॉपमध्ये त्या २५ ते ३0 वेळा आल्या असतील. चार-पाच तास थांबून त्या आमचे काम पाहत होत्या. कौतुक आणि मार्गदर्शनही करीत राहिल्या. महत्त्वाच्या सूचना करीत राहिल्या. जर खरोखरच पुतळा चांगला झाला असेल, तर त्याचे श्रेय सुहासिनीदेवी घाटगे यांनाच आहे. मला आजच्या युगातील महान व्यक्तीचा पुतळा बनविता आला. एवढे माझ्यासाठी खूप आणि पुरेसे आहे, अशी प्रतिक्रिया शिल्पकार किशोर पुरेकर यांनी व्यक्त केली.इतिहास प्रेमाबद्दलही भित्तिशिल्प हवेपुतळ्याच्या पाठीमागे जी सात भित्तिशिल्प आहेत. त्यात विक्रमसिंह यांचे कार्य, घराणे, वंशावळ मांडली आहे. यात त्यांच्या इतिहास प्रेमाबद्दलही एक शिल्प असावे, अशी मागणी होत आहे. १९८८ मध्ये त्यांनी कागलमधून रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यासाठी युवकांचे एक पथक पाठविले होते. त्यांचा सर्व खर्चर्ही त्यांनी दिला होता. तेव्हा हा दिवस फारसा परिचित झाला नव्हता. विशेष म्हणजे, हे पथक सायकलीने गेले होते, असे या पथकातील सदस्यअनिल जाधव यांनी सांगितले. पन्हाळा-पावनखिंड पदभ्रंमती, शिवशाहिरांची व्याख्यानमाला, शाहू जयंती, इतिहास संशोधकांना प्रोत्साहन, ग्रंथनिर्मितीला सहाय, असे मोठे कार्य त्यांचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर