शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘कनवा’मध्ये शनिवारपासून विभागीय साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:07 IST

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, करवीरनगर वाचन मंदिर (कनवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दुसरे विभागीय साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे. कनवाच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहातील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, तर स्वागताअध्यक्ष उद्योजिका अनिता जनवाडकर आहेत. संमेलनात सोशल मिडिया व साहित्य याविषयावर परिसंवाद होणार आहे, अशी माहिती कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी आणि कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे‘कनवा’मध्ये शनिवारपासून विभागीय साहित्य संमेलन‘सोशल मिडिया व साहित्य’बाबत परिसंवाद; कादंबरी अभिवाचन कथाकथन होणार

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, करवीरनगर वाचन मंदिर (कनवा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) आणि रविवारी (दि. १५) दुसरे विभागीय साहित्य संमेलन कोल्हापुरात होणार आहे. कनवाच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहातील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, तर स्वागताअध्यक्ष उद्योजिका अनिता जनवाडकर आहेत. संमेलनात सोशल मिडिया व साहित्य याविषयावर परिसंवाद होणार आहे, अशी माहिती कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी आणि कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.नंदकुमार जोशी म्हणाले, या संमेलनाचे उदघाटन शनिवारी सायंकाळी पाच वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पदाधिकारी प्रमुख उपस्थित असतील.

उदघाटनानंतर सात वाजता कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक अरविंद देशपांडे असतील. सतीश कुलकर्णी म्हणाले, संमेलनाचा समारोप रविवारी दुपारी चार वाजता भाजपचे महानगरजिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, कुमुदिनी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

यावेळी स्वयंसिद्धाचे संचालिका कांचनताई परुळेकर, श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे यांचा सत्कार केला जाणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, संजीवनी तोफखाने, अश्विनी वळीवडेकर, अनिल वेल्हाळ, उदय सांगवडेकर, दीपक गाडवे, मनिषा शेणई उपस्थित होत्या.

संमेलनात रविवारी

  • सकाळी ९.३० वाजता. : अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीचे अभिवाचन (डॉ. हिमांशू स्मार्त)
  • सकाळी १०.३० वाजता :सोशल मीडिया व साहित्य याविषयावर परिसंवाद (विनय गुप्ते, विनायक पाचलग)
  • दुपारी २ वाजता : कथाकथन (विकास कुलकर्णी, हेमा गंगातीरकर)

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर