शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

corona virus In Kolhapur : पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट बनली धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:02 IST

corona virus In Kolhapur : जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर्षीच्या केवळ साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ५५१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, केवळ दुसऱ्या लाटेत ३३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेच्या तोंडावर आरोग्य यंत्रणा आणखी भक्कम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट बनली धोकादायकसहा महिन्यांत १ लाख ३२ हजारांवर रुग्ण; ३३९२ जणांचा मृत्यू

समीर देशपांडेकोल्हापूर  :  जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. यावर्षीच्या केवळ साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ५५१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, केवळ दुसऱ्या लाटेत ३३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेच्या तोंडावर आरोग्य यंत्रणा आणखी भक्कम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.मे आणि जून या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. मे महिन्यात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही नियम अंमलबजावणीमध्ये चाललेला धरसोडपणा आणि नागरिकांची बेफिकिरी या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनास्थिती अजूनही नियंत्रणामध्ये आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलनात्मक स्थितीतपशील                    पहिली लाट                दुसरी लाट

  • नमुना तपासणी             ३०३५७९              १०१२८६१
  • पॉझिटिव्ह रुग्ण              ४४,४३८              १.३२,५५१
  • दैनंदिन अधिकतम रुग्णसंख्या -१७४७ २२०२
  • कोविड केअर सेंटर्स - ६३ १९७
  • समर्पित कोविड रुग्णालय  - ४५ १०७
  • मृत्यू                                   १७०९           ३३९२
  •  दोन्ही लाटेतील पुरुष मृत्यू      ३३७६
  • दोन्ही लाटेतील महिला मृत्यू १७०५

दोन्ही लाटेतील बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती

  • कोरोनाबाधित रुग्ण  -१३.४४ टक्के
  • बरे झालेले रुग्ण ९१.१६ टक्के
  • सध्या क्रियाशील रुग्ण ७.२१ टक्के
  • मृत्यू २.९६ टक्के

लसीकरण

  • लसीकरण उद्दिष्ट ३१ लाख ९४ हजार ९९४
  • पहिला डोस घेतलेले १० लाख १८ हजार ३०१
  • पहिला डोस टक्केवारी ३२ टक्के
  • दुसरा डोस घेतलेले ४ लाख ३८ हजार ५४२
  • दुसरा डोस टक्केवारी १४ टक्के

कोरोनास्थिती नियंत्रणात न येण्याची कारणे१. मध्यंतरी झालेल्या काही निवडणुका२. प्रशासनाने व्यवहारबंदी करण्यास लावलेला उशीर३. स्थानिक पातळीवर न घेतलेली कडक भूमिका४. नागरिकांची बेफिकिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर