शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

‘कोल्हापूर’ राज्यात द्वितीय

By admin | Updated: May 26, 2016 00:20 IST

मुलींची बाजी : विभागाचा निकाल ८८.१० टक्के; विभागात सातारा तृतीय स्थानावर

कोल्हापूर : करिअरची दिशा ठरविणाऱ्या बारावी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल यावर्षी ८८.१० टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल ४.०३ टक्क्यांनी घटला आहे. टक्का घसरला असला तरी, कोल्हापूर विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकविला आहे. विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने ८८. ८१ टक्क्यांसह अव्वल स्थान मिळविले आहे. सांगलीने ८७.९० टक्क्यांसह द्वितीय स्थान अबाधित ठेवले असून, गतवर्षी प्रथम स्थानी असणारा सातारा जिल्हा ८७.३२ टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी आॅनलाईन निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल व सचिव शरद गोसावी यांनी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत विभागाचा निकाल जाहीर केला. यावेळी बी. एस. शेटे, डी. वाय. कदम, डी. बी. कुलाळ, आदी उपस्थित होते. कोल्हापूर विभागातून ७४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील १,२०,६१९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी १,०६,२६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ८८.१० इतकी आहे. या परीक्षेसाठी एकूण ७१,३५७ मुले तर, ५३,७५५ मुली बसल्या होत्या. मुलांची उत्तीर्णतेची संख्या ५७,६४६ असून, त्यांचे प्रमाण ८०.७९ टक्के इतके आहे, मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या ४९,९९१ असून, त्यांचे प्रमाण ९३ टक्के इतके आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेने १२.२१ टक्क्यांनी अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील २७४ कनिष्ठ महाविद्यालयांतून ४९,९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी ४४,३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८८.८१ टक्के आहे. सांगली जिल्ह्णातील २४७ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३३,५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांपैकी २९,५०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ८७.९० टक्के आहे. सातारा जिल्ह्णातील २२७ कनिष्ठ महाविद्यालयांतील ३७,०६२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांतील ३२,३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८७.३२ टक्के आहे. विभागात सलग पाचव्या वर्षी उत्तीर्णतेमध्ये मुलींनी आपली आघाडी कायम राखली आहे. गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३ जून) दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधणारनिकालात कमी-अधिक होत राहते. कोल्हापूर विभागाच्या तेरा वर्षांत पहिल्यांदा गेल्या वर्षी ९२.१३ टक्के इतका निकाल लागला. त्यात फारशी वाढ अथवा घट होणे अपेक्षित नव्हते. यावर्षी विभागाच्या घसरलेल्या टक्केवारीची कारणे शोधली जातील, असे मंडळाचे विभागीय अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी सांगितले. ते म्हणाले, कारणांचा शोध घेऊन त्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. गेल्यावर्षी ०.५९ टक्क्यांनी वाढूनही कोल्हापूर विभाग तृतीय क्रमांकावर होता. यंदा टक्केवारी घटली असली तरी, राज्यात विभागाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.जिल्हानिहाय निकालजिल्हाटक्केवारीकोल्हापूर८८.८१सांगली८७.९०सातारा८७.३२मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १२.२१ टक्क्यांनी अधिककोल्हापूर विभागाचा निकाल ४.०२ टक्क्यांनी घटलाविभागात कोल्हापूरची आघाडीगैरप्रकार निम्म्याने घटले.