शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आरटीई अंतर्गत दुसऱ्या प्रवेश फेरीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:51 IST

आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के राखीव कोट्यातून प्रवेश देण्याची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू झाली. प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून लॉटरी काढण्यात आली.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून लॉटरी आरटीई अंतर्गत दुसऱ्या प्रवेश फेरीस सुरुवात

कोल्हापूर : आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के राखीव कोट्यातून प्रवेश देण्याची दुसरी फेरी शुक्रवारपासून सुरू झाली. प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून लॉटरी काढण्यात आली.

सोमवारी (दि. १७) एनआयसी सेंटरकडून निवड झालेल्या बालकांची यादी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे, तसेच पालकांनाही एसएमएस केले जाणार आहेत. पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता, पोर्टलवर जाऊन प्रवेश निश्चितीची खातरजमा करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे.आरटीई अतंर्गत यापूर्वी पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाली आहे. त्याचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर आता दुसरी फेरी आजपासून सुरूहोत आहे. या फेरीत पालकांनी प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे, तसे न केल्यास त्यांना पुढील फेरीमध्ये संधी दिली जाणार नाही, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.पोर्टलवर जाऊन आपला भरलेला फॉर्म युजर आयडी व पासवर्ड टाकून ओपन करावा. त्यामध्ये अ‍ॅडमिट कार्ड या टॅबवर क्लिक करून त्याची प्रिंंट काढावी. ही प्रिंट पालकांनी प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन शहरी भागासाठी महानगरपालिका व ग्रामीण भागासाठी पंचायत समितीतील शिक्षण विभागात जमा करायची आहे. तेथील शाळा पडताळणी समितीकडे आपले अ‍ॅडमिट कार्ड व कागदपत्रे प्रमाणीत करून घ्यावयाची आहेत.

विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र असल्याबाबतचे पत्र गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या सहीने घेऊन त्या पत्राची प्रत संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश निश्चित करावयाचा आहे. पालकांनी शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे न तपासता परस्पर शाळेत दिल्यास पाल्यास प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पडताळणी समितीच्या शिफारशीशिवाय कोणत्याही शाळांनी प्रवेश द्यायचा नाही, असे झाल्यास निवड रद्द केली जाईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर