शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
4
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
5
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
6
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
7
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
8
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
9
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
10
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
11
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
12
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
13
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
14
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
15
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
16
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
17
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
18
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
19
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

हॉटेल व्हिक्टर पॅलेसला ठोकले सील

By admin | Updated: February 17, 2016 00:47 IST

महापालिकेची कारवाई : गेल्या तीन वर्षांपासून घरफाळा थकबाकी २५ लाख

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून घरफाळा भरला नाही म्हणून महानगरपालिका घरफाळा विभागाने मंगळवारी जुन्या पुणे-बंगलोर महामार्गावरील हॉटेल व्हिक्टर पॅलेसला सील ठोकले. कारवाईवेळी हॉटेलमधील कर्मचारी पळून गेल्यामुळे मनपा अधिकाऱ्यांना हॉटेल शेजारचे पंच बोलावून त्यांच्या समक्ष ही कारवाई करावी लागली. दहा लाखांच्यावर ज्यांची थकबाकी आहे, अशा मिळकतधारकांवर प्रशासनाने कारवाईचा फास आवळला आहे.महानगरपालिका घरफाळा विभागाने एक फेबु्रवारीपासून घरफाळा थकबाकी वसुलीची मोहीम व्यापक केली आहे. शहरातील चारही विभागीय कार्यालयांत वसुलीसाठी अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चार वसुली पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडे त्यांच्या त्यांच्या हद्दीतील थकबाकीदारांची यादी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी लोटस हॉस्पिटलच्या इमारतील सील ठोकल्यानंतर मंगळवारी दुपारी हॉटेल व्हिक्टर पॅलेसला सील लावावे लागले. व्ही. एच. अपराध हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे हे हॉटेल असून, भोगवटादार म्हणून विजय विक्रमसिंह अपराध यांची महानगरपालिका दफ्तरी नोंद आहे. सन २०१३ पासून हॉटेल व्यवस्थापनाने घरफाळा भरला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली होती. नोटीसप्रमाणे १७ डिसेंबर २०१५ ला आयुक्त कार्यालयात झालेल्या सुनावणीवेळी आठ दिवसांची मुदत मागून घेतली होती. नंतर हॉटेल प्रशासाने दहा लाख रुपये भरले; परंतु उर्वरित २५ लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. पुन्हा नोटीस दिली, त्यावेळी पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली; परंतु त्यांनी आजअखेर थकबाकी रक्कम भरलेली नाही. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मनपाचे करसंग्राहक व निर्धारक दिवाकर कारंडे, अधीक्षक दीपक टिकेकर हे कर्मचाऱ्यांसह हॉटेलवर पोहोचले. त्यांनी हॉटेल सील करायला आलोय, असे सांगताच काही कर्मचारी तेथून पळून गेले. व्हिक्टर पॅलेस हे कोल्हापुरात एक नामवंत हॉटेल असून त्याला सील ठोकल्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)