शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

३८ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील, ७२ व्यापाऱ्यांना नोटिसा : एलबीटी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:30 IST

महानगरपालिका स्थानिक कर निर्धारण न करणाऱ्या ३८ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली असून, ७२ व्यापाऱ्यांना बँक खाते सील का करण्यात येऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. करनिर्धारण पूर्ण करून घेण्याबाबत आवाहन करूनही प्रतिसाद न दिल्यामुळे स्थानिक संस्था कर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे३८ व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील, ७२ व्यापाऱ्यांना नोटिसा एलबीटी विभागाची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिका स्थानिक कर निर्धारण न करणाऱ्या ३८ व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आली असून, ७२ व्यापाऱ्यांना बँक खाते सील का करण्यात येऊ नये म्हणून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. करनिर्धारण पूर्ण करून घेण्याबाबत आवाहन करूनही प्रतिसाद न दिल्यामुळे स्थानिक संस्था कर अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली.महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून व्यापाऱ्यांना कागदपत्रे स्वीकारणे व करनिर्धारण पूर्ण करण्याकरिता दि. १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबरअखेर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये मंगळवारअखेर ९१ व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून कागदपत्रे जमा केलेली आहेत.

यापूर्वी व्यापाऱ्यांना दुकानाचे असेसमेंट करून घेऊन रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. तरीही कराची रक्कम भरणा न केल्यास त्यांची बँक खाती सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एल बी टी आढावा बैठकीत नियमानुसार कारवाई करण्याबाबत आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.ज्या व्यापाऱ्यांनी एलबीटी असेसमेंट करून घेतलेले नाही, अशांना त्यांच्या फर्मचे करनिर्धारण पूर्ण करून घेण्याकरिता अंतिम संधी म्हणून विशेष शिबिर छत्रपती शिवाजी मार्केट, दुसरा मजला येथील स्थानिक संस्था कर कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला आहे.याबाबत अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शहरातील व्यापारी असोसिएशन यांची बैठक घेऊन जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवून त्यांचे करनिर्धारण पूर्ण करून घेऊन कारवाई टाळावी, असे आवाहन केले. यावेळी व्यापारी असोसिएशनतर्फे सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

एलबीटी रद्द झाला तरी असेसमेंट सुरूचकोल्हापूर महानगरपालिका हद्दीत लागू करण्यात आलेल्या एलबीटी कराचे अस्तित्व काही वर्षेच राहिले. दोन वर्षांपूर्वी हा कर राज्य सरकारने रद्द केला. मात्र ज्या काळात एलबीटी कराची अंमलबजावणी सुरू होती, त्या काळाचे असेसमेंट करणे ही व्यापाऱ्यांची जबाबदारी होती. स्वत:च्या व्यवसायाचे स्वत:च असेसमेंट करून एलबीटी व्यापाऱ्यांनी भरायचा होता. परंतु व्यापाऱ्यांनी तीही तसदी घेतलेली नाही. कर बुडविण्याच्या हेतूने टाळाटाळ करीत आहेत.

मिळकतींवर बोजा चढविणारमहापालिका प्रशासनाने सध्या व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून असेसमेंट करून घ्यावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. आवाहन करून, नोटीस देऊनही ज्यांनी केलेले नाही, त्यांच्यावर आता बॅँक खाती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.

शहरात तीन हजार व्यापाऱ्यांनी असेसमेंट केले नाही. ३१ डिसेंबर रोजी शिबिर संपले की संबंधित व्यापाऱ्यांच्या थकबाकी निश्चित करून त्यांच्या मिळकतींवर बोजा चढविण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत.व्यापाऱ्यांच्या सूचनाअभय योजनेमध्ये भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांचे कर निर्धारण पूर्ण झाल्याच्या आदेशाचे पत्र मिळावे. या योजनेत भाग घेता येणार नसलेल्या व्यापाऱ्यांचे कर निर्धारण ३१ जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण करून घ्यावेत.महापालिकेने नेमलेले सी. ए. पॅनेल आणि व्यापारी यांच्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी एलबीटीची सुनावणी एलबीटी प्रमुख सुनील बिद्री यांच्यासमोर घेण्यात यावी. कर निर्धारणावर महापालिकेने १०० टक्के दंडव्याज रद्द करावे, अशी मागणीही व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी केली. तसेच महापालिकेच्या एलबीटी संदर्भातील शिबिराचा लाभ व्यापाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही केले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाTaxकरkolhapurकोल्हापूर