कुरुंदवाड : येणाऱ्या प्रत्येक संकटाला जिद्दीने तोंड दिले तरच जीवनात यशस्वी होता येते. शाळेतून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडते. लढवय्या स्त्रियांबद्दल मला नेहमी अभिमान असतो. त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटात नायिका या जिद्दीने लढणाऱ्या दाखविल्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी केले.येथील साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्सच्या रौप्यमहोत्सवी सांगता कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भालकर बोलत होते. अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. नगराध्यक्षा मनीषा डांगे प्रमुख उपस्थित होत्या. संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन व माजी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भालकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.प्रारंभी मुख्याध्यापिका सुवर्णा यादव यांनी स्वागत व संस्थेचे सचिव अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्यासह माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कनवाडकर, संचालिका विजया पाटील, जयश्री थोरात, विष्णू लोखंडे, सच्चिदानंद खाडीलकर, रोहिणी निर्मळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. माणिक नागावे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा कदम यांनी आभार मानले.
शाळेतील संस्कार आयुष्यभर उपयोगी
By admin | Updated: November 30, 2015 01:07 IST