शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारामध्ये आता दूध, भुकटीचा समावेश: संबंधित विभागांना स्वतंत्र आदेशाच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:49 IST

शालेय पोषण आहारात दूध किंवा दुधाच्या भुकटीचा समावेश करण्यात शासनाने शुक्रवारी (दि. २०) शर्तींच्या अधीन राहून मंजुरी दिली. त्यासंंबंधीचे आदेश शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास,

कोल्हापूर : शालेय पोषण आहारात दूध किंवा दुधाच्या भुकटीचा समावेश करण्यात शासनाने शुक्रवारी (दि. २०) शर्तींच्या अधीन राहून मंजुरी दिली. त्यासंंबंधीचे आदेश शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वतंत्रपणे तत्काळ काढावेत, अशा सूचना शासनाने काढल्या आहेत. दूध भुकटीचे दर कोसळल्यानंतर राज्यात दूध बंद आंदोलन झाले. त्यामध्ये शिल्लक दूध व त्यापासून भुकटी करून ती पोषण आहारामध्ये द्यावी, अशी मागणी पुढे आली होती.

हा मूळ शासन आदेश कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचा आहे. त्यामध्ये दूध भुकटीसंबंधी आदेश देण्यात आला असून, त्यासाठी येणारा खर्च संबंधित विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून करण्यात यावा; एवढाच त्यामध्ये उल्लेख आहे. आता हे संबंधित विभाग स्वतंत्रपणे आदेश काढून दूध व भुकटी खरेदीची नियमावली निश्चित करून मग चिमुकल्या मुलांच्या मुखात प्रत्यक्ष दुधाचे थेंब पडायला आणखी किती वर्षे जातील, हे सांगणे अवघड आहे.शासनाने या निर्णयान्वये दुधाची भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुक्रमे ५० रुपये प्रतिकिलो आणि पाच रुपये प्रतिलिटर प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय १९ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला.

हे अनुदान आगामी तीन महिन्यांसाठी निर्यात होणाऱ्या दूध आणि भुकटीसाठी देण्यात येईल. भारताबाहेर दूध व दूध भुकटी निर्यात केल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित अनुदान मागणी करणाºया प्रकल्पधारकांची आहे. ३.५/८.५ या प्रतीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देणार आहे. या योजनेचा लाभ घेणाºया प्रत्येक संस्थेने १३ जुलै २०१७ च्या निदेशानुसार दूध खरेदी देयकाची अदायगी संबंधित शेतकºयाच्या वैयक्तिक बँक खात्यावर आॅनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.