कोल्हापूर : शहीद जवान अभिजित सूर्यवंशी ट्रस्टतर्फे शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त आजी-माजी सैनिकांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी प्राेत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
याकरिता दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या जवानांच्या मुला-मुलींनी त्यांचे अर्ज गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह व त्यांच्या पालकांच्या सैनिकी साक्षांकित ओळखपत्रासह १८ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या शिवाजी पेठेतील शहीद वीर अभिजित निवास या कार्यालयात पाठवावीत. गुणाक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन मुला-मुलींची निवड शिष्यवृत्तीसाठी केली जाणार आहे. त्यांना अनुक्रमे १०००, ७०० आणि पाचशे रुपये अशी रक्कम शिष्यवृत्ती व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. तरी याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा मदनराव सूर्यवंशी यांनी केले आहे.