शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्य स्पर्धेची वेळ सायंकाळीच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:24 IST

राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देराज्य नाट्य स्पर्धेची वेळ सायंकाळीच करापरिवर्तन कला फौंडेशनची सांस्कृतिक संचालनालयाकडे मागणी

कोल्हापूर : राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे.प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २९ नाट्य कलाकृती सादर होणार आहेत. यातील काही नाटकांची वेळ दुपारी बारा वाजता करण्यात आली आहे. ही वेळ व्यवहार्य नाही. त्यामुळे रसिक या दरम्यानच्या नाटकांकडे पाठ फिरवतील. विशेष म्हणजे रविवारी दुपारी १२ वाजता तीन नाटके सादर होणार आहेत. हे अन्यायकारक आहे. राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना प्रेक्षकांच्या तिकिटातून मिळणाऱ्या रकमेच्या अर्धी रक्कम मिळते. त्यामुळे हौशी नाट्य संस्थांना ही मदत होते. दुपारी जर प्रयोग बारा वाजता होणार असेल, तर ही मदत मिळणार नाही.

कोल्हापूर केंद्रात कष्टकरी फेरीवाले, सर्वसामान्य नागरिक रात्रीच नाट्यप्रयोग पाहण्यास पसंती देतात. त्यांचाच या स्पर्धेच्या काळात हौशी नाट्यकर्मींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. या रसिकांना रविवारी सुट्टी मिळत नाही.

आमची संस्था स्पर्धेत फक्त बक्षिसासाठी सहभागी होत नाही, तर कलाकार घडावेत व प्रेक्षकांना नाटक बघता यावे या उद्देशाने सहभागी होते. ही संधी नाट्य स्पर्धेच्या रूपाने आम्हाला मिळते. त्यामुळे सर्वच नाट्यप्रयोग सायंकाळी सातनंतर घ्यावेत, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती फौंडेशनचे किरणसिंह चव्हाण यांनी दिली. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर