शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

संस्कृती उत्सवातील देखावे, प्रदर्शने आज खुली होणार

By admin | Updated: January 16, 2015 23:42 IST

कोल्हापुरातून उद्या शोभायात्रा : भारत विकास संगम संमेलनांतर्गत उत्सव

कोल्हापूर : चौथ्या भारत विकास संगम संमेलनातंर्गत कणेरी (ता. करवीर, कोल्हापूर) येथील सिद्धगिरी मठाच्या परिसरात रविवार(दि. १८)पासून आठवडाभर भारतीय संस्कृती उत्सव रंगणार आहे. त्याच्या तयारीसाठी सुमारे पाच हजार कारागीर, भाविक आणि स्वयंसेवक अहोरात्र झटत आहेत. उत्सवातील विविध प्रदर्शने, देखावे आणि कलाकृती, कलादालनाचे काम उद्या, शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होऊन ती पाहण्यासाठी खुली करण्यासाठी संयोजकांची आज, शुक्रवारी युद्धपातळीवर तयारी सुरू होती.शेतकऱ्यांनी आपली पिकांची स्वत:च विक्री करावी तसेच विविध कारागीरांच्या कलाकृती समाजापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने उत्सवस्थळी सहाशे स्टॉल्स्ची, प्रमुख कार्यक्रमस्थळी असलेला आठ लाख स्क्वेअर फुटांच्या मंडप उभारणी पूर्ण झाली आहे. भोजन मंडप, आयुर्वेदिक, शैक्षणिक आदी स्वरूपातील प्रदर्शनाचे मंडप उभारणीची तयारी वेगाने सुरू होती. एकेरी मार्ग, पार्किंगची व्यवस्था करण्याची लगबग दिवसभर सुरू होती. उत्सवानिमित्त रविवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजता शहरातील गांधी मैदानापासून शोभायात्रा काढण्यात येईल. दरम्यान, आज पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस उपजिल्हा अधीक्षक अमर जाधव, भारत विकास संगमचे प्रमुख संयोजक बसनगोंडा पाटील यांनी उत्सवस्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)