शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सजीव देखाव्यांची कसबा बावड्यात धूम

By admin | Updated: September 24, 2015 00:03 IST

कलात्मक, आकर्षक गणेशमूर्ती : ऐतिहासिक, धार्मिक, पर्यावरण, सामाजिक विषयांचे देखाव्यात प्रतिबिंब

कसबा बावडा : कसबा बावडा आणि परिसरातील मंडळांनी यंदाही सजीव देखाव्यांवर भर दिला आहे. ऐतिहासिक, धार्मिक, पर्यावरणावर आधारित, शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळ, हुंडाबळी, तसेच विनोदी आणि तांत्रिक देखाव्यांसह विविध वस्तंूपासून बनविण्यात आलेल्या कलात्मक आकर्षक गणेशमूर्ती हे यंदा बावड्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण असणार आहे. काही अपवाद मंडळाचे बुधवार (दि. २३) पासून देखावे खुले झाले. तर बहुतेक मंडळांचे गुरुवार (दि. २४) पासून देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहेत.पाटील गल्ली येथील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ यावर्षी ‘राजा शिवाजी’ हा सजीव देखावा सादर करीत आहे. यासाठी मंडळाने लाल महालची भव्य प्रतिकृती उभारली आहे. देखाव्यात तत्कालीन लग्नाचा प्रसंग, लाल महालातील लढाई व आकर्षक लाईट इफेक्ट हे प्रमुख आकर्षण असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी सांगितले.चौगले गल्ली येथील भारतवीर मित्र मंडळाने ‘देव तेथेची जाणावा’ हा सजीव देखावा केला आहे. दुष्काळ, पाऊस आणि पर्यावरणपूरक संदेश या देखाव्यातून दिला आहे. तालीम चौक येथील स्वस्तिक मित्र मंडळाने ‘प्रकाशवाट’ ‘करुया सुरुवात एका नव्या युगाची’ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर देखावा केला आहे. ठोंबरे गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाने ‘कलियुगी अफजलखान’ हा मोबाईलचे व्यसन यावर आधारित देखावा केला आहे. श्री मंगेश्वर तरुण मंडळाने ‘बाई हसली, पोरं फसली’ हा विनोदी देखावा केला आहे. कवडे गल्लीतील गणेशपूजा मित्र मंडळाने सीमा प्रश्नावर आधारित देखावा केला आहे. धनगर गल्ली येथील हिंदू एकता आंदोलनने दुष्काळावरील सामाजिक प्रश्न मांडणारा देखावा केला आहे.चव्हाण गल्लीतील सम्राट मित्र मंडळाने पशुपतीनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. डगमग बॉईजने विनोदी देखावा केला आहे. अंकुश ग्रुपने विनोदी देखावा केला आहे. जयभवानी तालीम मंडळाने ‘साई दर्शन’ हा तांत्रिक देखावा केला आहे. जय भवानी फ्रेंड सर्कलने विनोदी देखावा केला आहे. पंचमुखी तरुण मंडळाने ‘तुझविन सख्या रे’ हा विनोदी देखावा केला आहे. विश्वशांती मित्र मंडळाने शहीद जवान दिगंबर उलपे यांच्या जीवनावरील सजीव देखावा केला आहे.वाडकर गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने ‘बळ’ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर देखावा केला आहे. विजय विहार तरुण मंडळप्रणित शिवा ग्रुपने ‘तुझा खेळ तूच जाण’ हा भक्तिमय देखावा केला आहे. झेंडा चौक मंडळाने कुष्ठरोग्यांच्या जीवनावर सजीव देखावा केला आहे. कागलवाडी मित्र मंडळाने ‘बाल हनुमान’ देखावा केला आहे.अयोध्या कला, क्रीडा मंडळाने बाल गणेशाचा पाण्यात विहार हा तांत्रिक देखावा केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाने काड्यापेटीच्या काड्यांपासून आकर्षक गणेशमूर्ती केली आहे. शाहू तरुण मंडळाने वरीच्या तांदळापासून गणेशमूर्ती केली आहे. याशिवाय साईनाथ मित्र मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, भगतसिंह तरुण मंडळ यांच्या आकर्षक गणेशमूर्ती आहेत. (प्रतिनिधी)