शहरं
Join us  
Trending Stories
1
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
2
मराठा आंदोलक मुंबईच्या सीमेजवळ, महामार्गावर आंदोलकांसाठी अल्पोपाहाराची सोय
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
7
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
8
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
9
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
10
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
11
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
12
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
13
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
14
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
15
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
16
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
17
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
18
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
19
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
20
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!

टंचाईच्या ‘कळा’ उद्यापासून

By admin | Updated: March 31, 2016 00:36 IST

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा : जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे आव्हान; महापालिकेचे नियोजन

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला प्रथमच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत, म्हणूनच उद्या, शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. कोणत्या भागात कोणत्या दिवशी पाणी येणार याचेही नियोजन जाहीर केले आहे.शहरातील पाच लाख ६० हजार लोकसंख्येस दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका पंचगंगा व भोगावती नदीतून रोज १२० दशलक्ष लिटर इतका पाणी उपसा करते. तथापि, यावर्षी राधानगरी व काळम्मावाडी धरणांमध्ये कोल्हापूरच्या वाट्याचा एकूण ४.५० टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी जूनपर्यंत पुरविण्याचे नियोजन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने धरणातून सोडलेले पाणी महापालिकेच्या शिंगणापूर बंधाऱ्यामध्ये साठते. हेच पाणी पाटबंधारे विभाग पुन्हा नव्याने पाणी सोडण्याच्या रोटेशनपर्यंत पुरविणे आवश्यक आहे, म्हणून महापालिकेने दैनंदिन पाणी उपसा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.सम व विषम तारखेनुसार एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे.- मनीष पवार, जल अभियंताशिंगणापूर योजनागट - १ : १ एप्रिल : ए व बी वॉर्डमधील शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणारा साळोखेनगर ते शेंडा पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, देवकर पाणंद, जरगनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी परिसर.गट -२ : २ एप्रिल : ई वॉर्डमधील शिंगणापूर योजनेतून पाणीपुरवठा होणारा सर्व संलग्न भाग, त्यामध्ये प्रामुख्याने राजारामपुरी परिसर, कावळा नाका, आदी.बालिंगा योजना (चंबूखडी)गट - १ : १ एप्रिल : फुलेवाडी ते सबजेल व्हॉल्व्हपर्यंतचा ए, बी, सी व डी वॉर्डमधील भाग. रिंगरोडमधील आपटेनगर पंपिंग (जुने)पर्यंतचा शहरी भाग, सानेगुरुजी वसाहत, मोहिते कॉलनी, क्रशर चौक, तुळजाभवानी कॉलनी, आपटेनगर ते रंकाळापर्यंतचा रोडच्या दोन्ही बाजूचा परिसर.गट-२ : २ एप्रिल : सबजेल व्हॉल्व्ह ते शाहूपुरीपर्यंतचा ए, बी, सी, डी व ई वॉर्डांतील भाग, रिंगरोड परिसर ग्रामीण भाग तसेच गंधर्वनगरी ते ए वन गॅरेजपर्यंतचा भाग, कणेरकर नगर परिसर.बावडा फिल्टर (पूरक यो.)गट-१ : १ एप्रिल : डीएसपी चौक ते शुगर मिलपर्यंत कसबा बावडा परिसर, लाईन बझार, कदमवाडी, भोसलेवाडी, कनाननगर, विचारेमाळ, शाहूपुरी, बापट कॅम्प, जाधववाडी, टेंबलाई टाकी ते संलग्न परिसर, सदर बाजार.गट-२ : २ एप्रिल : डीएसपी चौक ते वॉटरपार्क, खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत बावडा रोड पूर्व व पश्चिमेकडील संलग्न परिसर, रमणमळा, ताराबाई टाकीवरील सर्व संलग्न भाग, कावळा नाका टाकीवरील मार्केट यार्डपर्यंतचा परिसर, कोल्हापूर-सांगली रोड उत्तरेकडील व दक्षिणेकडील सर्व संलग्न भाग, स्टेशन रोड.