शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मंडईत धडक कारवाई, सावंतवाडी पालिकेने रस्त्यावरची दुकाने हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:45 IST

सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईने खऱ्या अर्थांने मोकळा श्वास घेतला. भाजी मंडईतील दहा बारा बेकायदेशीर असलेली दुकाने नगरपालिकेने काढून टाकली.

ठळक मुद्दे भाजी मंडईत धडक कारवाई, सावंतवाडी पालिकेने रस्त्यावरची दुकाने हटवली मंडईच्या आतमधील दुकानदारांनाही लावली शिस्त

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईने खऱ्या अर्थांने मोकळा श्वास घेतला. भाजी मंडईतील दहा बारा बेकायदेशीर असलेली दुकाने नगरपालिकेने काढून टाकली.कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय हे अतिक्रमण हटविण्यात आले असून, भाजी मंडईत जाणारा रस्ताही मोकळा झाला आहे.

या अतिक्रमाणात काहिंनी मोठ्या प्रमाणात जागा बळकावली होती. ती जागा रिकामी करण्यात पालिकेला यश आले आहे. ही कारवाई सकाळी दहा वाजल्यापासून हाती घेण्यात आली होती, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातच मुख्य संकुलात ज्यांना दुकाने देण्यात आली होती, त्यांनीही या ठिकाणचे व्यापारी गाळे आपल्याकडे ठेवले होते. तसेच काही मंडईतील दुकानदारांनीही मोठ्या प्रमाणात जागा व्यापली होती.मंडईत येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना आतमध्ये शिरण्यास रस्ताही मिळत नव्हता. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. मंडईमध्ये कचरा गाडी जात नव्हती, याबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी मंडईची पाहणी केली होती. तसेच या मंडईमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे, हे अतिक्रमण तातडीने काढावे तसेच फिरत्या विक्रेत्यांना योग्य ती जागा देण्यात यावी असा आदेश प्रशासनाला दिला होता. त्याप्रमाणे हे अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली.शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून संत गाडगेबाबा भाजी मंडईतील हे अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली. अतिक्रमण हटविण्यासाठी बांधकाम अभियंता संतोष भिसे, मुख्य लिपीक आसावरी शिरोडकर, बाबा शेख, दीपक म्हापसेकर, प्रदीप सावरवाडकर, गजानन परब, मनोज सुकी आदिंसह अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.

अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व कामगारांनी सुरूवात केली. सुरूवातीच दुकान हटविताना दुकानदार आणि पालिका यांच्यात थोडीशी गरमागरम चर्चा झाली. मात्र, त्यांना काहि दिवसांची मुदत दिल्यानंतर पुढील अनधिकृत दुकाने हटविण्यास सुरूवात करण्यात आली.

यामध्ये फिरत्या विक्रेत्यांनाही बाजूला करण्यात आले आहे. तसेच मंडईत काहि मोठ मोठी जागा अडवली. त्यांनाही जेवढा दुकान गाळा आहे त्यामध्येच आपले दुकान लावण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. 

टॅग्स :Marketबाजारsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी