शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सत्तेच्या सारीपाटात ‘सावकरां’चा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:33 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना-भाजप या बड्या राजकीय पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवत, ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना-भाजप या बड्या राजकीय पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवत, माजी मंत्री विनय कोरे यांनी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या पदांवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे कसब दाखविले आहे. जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकरी संघ, पन्हाळा व हातकणंगले पंचायत समिती सभापती अशी सहा पदे ‘जनसुराज्य’च्या ताब्यात घेऊन पन्हाळा-शाहूवाडी व हातकणंगले मतदारसंघांची बांधणी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेच्या तोंडावर सत्तेच्या सारीपाटात आघाडी व युतीपेक्षा ‘जनसुराज्य’च वरचढ ठरल्याचे चित्र दिसत आहे.राष्टÑवादीशी फारकत घेत २००४ ला कोरे यांनी ‘जनसुराज्य’ची स्थापना केली. स्थापनेच्या वर्षातच तब्बल चार आमदार निवडून आणून कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेत कोरे यांनी दमदार एंट्री केली; पण २००९ पासून पीछेहाट होऊन २०१४ ला त्यांचा अवघ्या २८८ मतांनी पराभव झाला. हा पराभूत झाल्यापासूनच ज्यांनी विधानसभेला उघड आणि अंतर्गत टांग मारली, त्यांचे जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपासून उट्टे काढण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांनी हवा केली असताना सहा जागा निवडून आणून विनय कोरे राजकारणातून संपलेले नाहीत, हे दाखवून दिले.विधानसभा सोपी करायची झाल्यास कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. जिल्हा परिषदेत सहा सदस्य असतानाही भाजपशी समझोता करून ‘बांधकाम’ व ‘समाजकल्याण’ ही दोन सभापतिपदे स्वत:कडे घेतली. शाहूवाडीत विरोधकांना शह देण्यासाठी बांधकाम सभापतिपदी जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरिडकर यांना संधी दिली. दरम्यानच्या काळात विक्री झालेला दत्त-आसुर्ले साखर कारखाना पुनरुज्जीवित करून तिथे कार्यकर्त्यांची वर्णी लावली. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी असलेल्या शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह माने (भादोले) यांची वर्णी लावून हातकणंगले मतदारसंघात राजीव आवळे यांना ताकद दिली. त्यानंतर झालेल्या बाजार समिती सभापतिपद रोटेशनने आमदार सतेज पाटील गटाकडे जाणार होते; पण कोरे त्यासाठी आग्रही राहिले आणि शाहूवाडीचे बाबासाहेब लाड यांची सभापतिपदी वर्णी लावली. गेल्या वेळेला सरुड (सत्यजित पाटील यांचे गाव) मधील मताधिक्यच कोरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते. स्थानिकचा उमेदवार असल्याने त्या गावात फारसे हाताला लागणार नाही, म्हणूनच तेथील मताधिक्य भरून काढण्यासाठी लाड यांच्या रूपाने चरण गावची मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हातकणंगले पंचायत समिती सभापतिपदही सरितादेवी मोहिते यांच्या रूपाने ‘जनसुराज्य’कडेच घेतले. जिल्हा व तालुका पातळीवरील सर्वाधिक पदे सध्या जनसुराज्यकडेच अधिक आहेत.सत्तेच्या केंद्रस्थानी सावकरचजनसुराज्य जिल्हा बॅँक, बाजार समिती व शेतकरी संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तर जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना-स्वाभिमानीशी आघाडी करीत सत्तेत सहभागी आहे. एकूणच जिल्ह्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी पुन्हा विनय कोरेच राहिले आहेत.