शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘सावकर’, 'प्रकाशआण्णा’ वाकड्यात, जिल्ह्याची राजकीय दिशा बदलणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 15:36 IST

आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निकालाने सत्तारूढ आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून त्यातून आमदार विनय कोरे यांनी ‘पापा’ची किंमत तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ‘पांग’ फेडण्याचा इशारा देऊन भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. आवाडे यांना गडहिंग्लज विभागासह राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहराने झटका दिला असला तरी त्यांच्या होमपिच ‘हातकणंगले’मध्ये अर्जुन आबीटकर यांनी घेतलेल्या ६९ मतांनी पराभवाचा पाया रचला, हेही विसरता येणार नाही.

विधानपरिषद निवडणुकीपासून जिल्ह्यात विनय काेरे, प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक यांनी मोट बांधली आहे. वडगाव बाजार समितीमध्ये तिन्ही नेत्यांनी ताकद दाखवून देत जिल्हा बँकेची तयारी सुरू केली होती. सत्तारुढ आघाडीतील नाराजांना सोबत घेऊन पॅनेलची तयारी केली होती. त्यामुळेच सत्तारुढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत काेरे व आवाडे यांना आत घेऊन ‘बिनविरोध’चा प्रयत्न केला. मात्र, अनपेक्षितपणे सोबत असणारे बाजूला गेले आणि निवडणूक लागली.सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे पतसंस्था-बँका गटातील मतदारांची संख्या आवाडे यांना विजयापर्यंत नेणारी होती. सर्व नेते आपणाला मदत करतील, या आशेवर आवाडे गाफिल राहिले आणि तिथेच दणका बसला. ‘पतसंस्था’ गटातील पराभव आवाडे यांच्या जिव्हारी लागला आहे. विश्वासाने आघाडीत घेऊन घात केल्याची भावना त्यांची आहे.

प्रक्रिया गटात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना विनय काेरे यांनी विरोध केला असला तरी ४४८ पैकी १६० मते त्यांच्याकडे घट्ट होती. सत्तारूढ आघाडीच्या काही नेत्यांनी मदन कारंडे व प्रदीप पाटील यांच्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, मताचे पॉकिट व बाबासाहेब पाटील यांच्या संपर्कापुढे त्या नेत्यांचे प्रयत्नही अपयशी ठरले. जरी नेत्यांनी आसुर्लेकरांचा पराभव करायचाच असे ठरविले असते तरी मतदार त्यांच्या हाताला लागले नसते, हेही खरे आहे.रोख सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे कोरे, आवाडे यांच्या आरोपाचा रोख सत्तारुढ आघाडीतील नेत्यांकडे असल्याने निकालाचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचे पडसाद आगामी बाजार समिती, महापालिका, जिल्हा परिषदेसह लोकसभा निवडणुकीत दिसणार हे मात्र निश्चित आहे.

राखीव गटातही सोयीचे राजकारण

सत्तारूढ गटाच्या राखीव गटातील जागा मोठ्या फरकाने विजयी झाल्या असल्या तरी महिला गटात झालेले मतदान पाहता येथेही सोयीचे राजकारण झाल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरेPrakash Awadeप्रकाश आवाडे