उपसरपंच राधाबाई पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. स्वागत ग्रामसेवक आर. के. पाटील तर, प्रास्ताविक सरपंच अमित पाटील यांनी केले. उपसरपंच सविता चौगुले यांनी नामदार मुश्रीफ व नवीद मुश्रीफ यांनी आपल्याला संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून गावाच्या विकासकामात भरीव योगदानाचे आश्वासन दिले.
या वेळी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील, माजी सरपंच देवानंद पाटील, जयश्री पाटील, किरण गवाणकर, शशिकांत पाटील, विठ्ठल पाटील, संतोष मोरबाळे, प्रेरणा चौगुले, सुमन मगदूम, वैशाली भाकरे, अश्विनी कळमकर, बंडोपंत कांबळे, प्रा. एकनाथ देशमुख, एकनाथ कळमकर, माजी सरपंच पांडुरंग बुगडे, रंगराव रंडे, बाळासो पाटील, डॉ. सचिन मोरबाळे, सूर्यकांत सुतार, कृषी सहाय्यक एस. एच. शिंदे, डाॅ. पल्लवी कामत, तलाठी शम्मा मुल्लाणी, कोतवाल सुनील शेणवी, शशिकांत जाधव, वैभव लोंढे आदी उपस्थित होते.