शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

एक झाड वाचविण्यासाठी शासनाला दिली दहा गुंठे जागा...

By admin | Updated: June 4, 2017 22:50 IST

एक झाड वाचविण्यासाठी शासनाला दिली दहा गुंठे जागा...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गात शेकडो झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. हे हृदयद्रावक चित्र असतानाच निसर्ग वाचविण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेली माणसंही सातारा जिल्ह्यात आहेत. पाचवड येथील गोरख चिंच वाचविण्यासाठी तेथील शेतकऱ्याने तब्बल दहा गुंठे जागा सरकारला दिली. वाई तालुक्यातील पाचवडमधून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गालगत पांडुरंग गायकवाड यांची दहा एकर वडिलोपार्जित जागा आहे. त्यांची तीन एकर जागा पुनर्वसनात गेली. त्यामुळे उरलेल्या जागेवर उदरनिर्वाह चालला आहे. त्यांच्या जागेतच एक गोरख चिंच आहे. या झाडाशी त्यांचे अनेक पिढ्यांचे नाते जडले आहे. हे सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे वर्षे जुने असल्याची ग्रामस्थांची धारणा आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मोठी आसामी असलेले विश्वनाथ सदाशिव नातू यांची ही मुळची जागा. ती पुढे गायकवाड यांनी खरेदी केली. या जागेतच रस्त्याच्या एका बाजूला मोठी दगडी जिन्याची विहिर आहे. विहिरीपासून सुमारे वीस फुटांवर हे गोरख चिंचेचे झाड आहे. गोरख चिंचेचे झाड सहजासहजी उगवत नाही. जिल्ह्यात पाचवड, मेणवली तर पाटण तालुक्यातील आवर्डे असे तीन ठिकाणीच हे झाड आहे. त्याचे बी टाकले तरी झाड उगवत नाही. हा पाचवड ग्रामस्थांचा आजवरचा इतिहास आहे. या दुर्मिळ झाडावर महामार्गाच्या सहापदरीकरणात कुऱ्हाड चालविली तर मोठा ठेवा हरवून जाईल या भावनेने गायकवाड यांनी हे झाड तोडण्यास विरोध केला. मग हे झाड तोडण्याऐवजी महामार्गाचा सेवा रस्ता झाडाच्या कडेने वळविण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यासाठी जास्त जागा लागणार होती. यासाठी झळ सहन करण्याची तयारी पांडुरंग गायकवाड यांनी ठेवली. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेची जमिन ‘सोन्याचं अंडी देणारी कोंबडी’ म्हणून समजली जाते. पण गायकवाड यांनी चिंचेचे झाड जगविण्यासाठी केवळ बारा हजार रुपये गुंठा या दराने देऊन टाकली. हे झाड तोडणार असतील तर ते मुळासकट उचलून ते किसन वीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्याचे पुनर्वसन करण्याची तयारी किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदत भोसले यांनीही व्यक्त केली होती. मात्र गायकवाड यांच्या दातृत्वामुळे ही वेळच आली नाही.