शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शेती वाचवा, शेतकरी वाचवा: घोषणांनी दणाणला परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:23 IST

Farmar Morcha Collcator Kolhapur- शेती वाचवा, शेतकरी वाचवा असा नारा देत कृषीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात रद्द करा, रद्द करा, कृषी कायदे रद्द करा, इंधन दरवाढ मागे घ्या, अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देशेती वाचवा, शेतकरी वाचवा: घोषणांनी दणाणला परिसर शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर :शेती वाचवा, शेतकरी वाचवा असा नारा देत कृषीविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शेतकरी कामगार पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात रद्द करा, रद्द करा, कृषी कायदे रद्द करा, इंधन दरवाढ मागे घ्या, अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेकापने आंदोलनाची हाक दिली होती. दुपारी एक वाजता बिंदू चौकातून सुरू झालेला मोर्चा लक्ष्मीपुरी, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनाचे नेतृत्व बाबूराव कदम, प्राचार्य टी. एस. पाटील, बाबासाहेब देवकर, भारत पाटील यांनी केले.यात दिलीप जाधव, संभाजी जगदाळे, अमित कांबळे, उज्वला कदम, संतराम पाटील, भारत पाटील, अशोक पाटील, संग्राम माने, मोहन पाटील, केरबा पाटील, दत्तात्रय पाटील, लता कांदळकर, सरदार पाटील, वसंत कांबळे, राजेंद्र देशमाने, भीमराव देसाई, चंद्रकांत बागडी, पांडुरंग पाटील यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले. 

मागण्या

  • शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा
  • कामगारविरोधी कायदे रद्द करून कंत्राटीकरण थांबवा
  • लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीजबिले माफ करा
  • पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ मागे घ्या
  • नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान द्या
  • एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत एकरकमी बिल द्या

 

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर