शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

‘स्थायी’च्या फुटीचा योग्यवेळी सोक्षमोक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:51 AM

कोल्हापूर : ‘महापालिका चौकातील ‘गॉसिप’ थांबवा, एकमेकांकडे आरोपांचे बोट करून शंकास्पद वातावरण निर्माण करू नका,’ अशी सक्त ताकीद काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी आघाडीच्या नगरसेवकांना दिली तसेच जे काही घडले त्याचा सोक्षमोक्ष आम्ही योग्यवेळी लावू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवेळी राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीतील खदखद बाहेर पडल्यामुळे अजिंक्य चव्हाण आणि अफजल ...

कोल्हापूर : ‘महापालिका चौकातील ‘गॉसिप’ थांबवा, एकमेकांकडे आरोपांचे बोट करून शंकास्पद वातावरण निर्माण करू नका,’ अशी सक्त ताकीद काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनी आघाडीच्या नगरसेवकांना दिली तसेच जे काही घडले त्याचा सोक्षमोक्ष आम्ही योग्यवेळी लावू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवेळी राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीतील खदखद बाहेर पडल्यामुळे अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी विरोधी मतदान केले, तर त्यानंतर मुरलीधर जाधव यांनी शनिवारी राष्टÑवादी सोडण्याचा इशारा दिल्याने राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीचे नेते पुरते भेदरले. आघाडीला पुन्हा फुटीचा धोका पोहोचू नये म्हणून राष्टÑवादी-काँग्रेस आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी सर्वच नगरसेवकांची रविवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. या बैठकीत अनेक नगरसेवकांनी दोन्हीही नेत्यांची वैयक्तिक भेट घेऊन आपला उद्रेक उघड केला. या बैठकीत साºयांचे लक्ष हे जयंत पाटील आणि मुरलीधर जाधव यांच्याकडेच होते.बंद खोलीतील बैठकीनंतर सर्व नगरसेवकांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये आमदार सतेज पाटील म्हणाले, फुटीर दोघांबाबत पक्ष निर्णय घेईलच; पण घडलेल्या फुटीर घटनेची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. महापालिकेतील घोेडेबाजार बंद करण्यासाठी पक्षीय राजकारणाला चालना दिली आहे; पण आपल्या आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण करू नका, महापालिका चौकात चर्चा करणे बंद करा, एकमेकांकडे संशयाचे बोट दाखविणे, अनुद्गार काढणेही बंद करा, तुमची तक्रार असेल तर ती पदाधिकारी-गटनेत्यांकडे करा, त्यांनी ऐकले नाही तर आम्हाला सांगा, आम्ही लक्ष घालू. सभागृहात अडी-अडचणी मांडा पण आघाडीबाबत जाहीरपणे बोलणे बोलू नका, अशीही सक्त ताकीद दिली.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘जयंत पाटील यांनीही पार्टीवरील राग सोडावा. सरांना बाजूला ठेवून महापालिकेतील राजकारण होऊ शकत नाही. जर हे कृत्य सरांनी केले असते तर ते मला भेटले नसते. ‘त्या’ विषयावर पुन्हा उणं-दुणं नको. महापौर निवडीवेळी दक्ष राहावे लागणार आहे, त्यासाठी वारंवार बैठका घेऊ, सरांनीही आता सारे विसरावे,’ असेही ते म्हणाले.माझ्याबद्दल खुलासाही करा की!आमदार सतेज पाटील नगरसेवकांसमोर बोलत असतानाच प्रा. जयंत पाटील उत्तरले, ‘माझ्याबद्दलही बोला की, अन्यथा मलाही प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करावा लागेल.’ यावर आमदार पाटील म्हणाले, ‘झालेल्या घटनेची सर्व कृती समोर येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काहीही बोललो नाही.’ यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेत ‘माझ्यावर आरोप झाले आहेत’ असे सांगताच आमदार पाटील म्हणाले, ‘गेली २५ वर्षे जयंत पाटील यांना ओळखतो. त्यांना उलटं जायचं असेल तर ते उघडपणे जातील. ते अशा छुप्या पद्धतीने कधीही करणार नाहीत. त्यामुळे जयंत पाटील हा विषय ‘क्लोज’ झाला आहे.’पदाधिकारी, कारभाºयांविरुद्ध तक्रारीसर्व नगरसेवकांची बैठक सुरू होण्यापूर्वी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, प्रा. जयंत पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, राष्टÑवादी शहराध्यक्ष राजू लाटकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनीबंद खोलीत सुमारे अर्धा तास चर्चाकेली.यावेळी प्रा. जयंत पाटील यांनी आपली भूमिका नेत्यांना समजावून सांगितली. त्यानंतर नाराज नगरसेवक मुरलीधर जाधव यांना बोलावून घेतले. त्यानंतर सरिता मोरे व नंदकुमार मोरे, उमा बनसोडे व त्यांचे पती शिवानंद तसेच सासरे श्रीकांत बनछोडे, शिक्षण सभापती वनिता देठे, सुभाष बुचडे, वहिदा सौदागर, शमा मुल्ला, दिलीप पवार यांनीही नेत्यांची वैयक्तिक भेट घेऊन काही कारभारी व पदाधिकाºयांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविला.कारभाºयांची पळापळदोन्हीही आघाडीच्या सर्व नगरसेवकांची बैठक सायंकाळी सहा वाजता असली तरी ज्या नगरसेवकांवर संशयाची सुई होती त्यांच्या उपस्थितीबाबत अनेकांना प्रतीक्षा लागली होती. त्यांच्यासाठी दोन्हीही आघाडीतील कारभाºयांची पळापळ व फोनाफोनी सुरू होती. ‘ते’ नगरसेवक बैठकीस आल्यानंतर अनेक कारभाºयांनी सुस्कारा सोडला. सर्व नगरसेवक शासकीय विश्रामगृहावर पोहोचल्यानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या हालचालींवर काही ‘कारभाºयां’ची नजर असल्याचे दिसत होते.दक्षतेच्या बैठका...पुन्हा फुटिरतेचा धोका नको म्हणून सावध झालेल्या मुश्रीफ-पाटील या दोन नेत्यांनी महापौर निवडीत पुन्हा धोका नको म्हणून येत्या पदाधिकाºयांबाबत असणाºया आक्षेपांबाबत पुन्हा शनिवारी (दि. ३ मार्च) बैठक घेऊ तसेच पुन्हा एकत्रित नगरसेवकांची बैठक १७ मार्चला घेऊ, असेही सांगितले.भाजपकडे पैसा, पण आम्हीही दरिद्री नाहीभाजप नेत्यांकडे पैसा आहे म्हणजे आम्ही दरिद्री नाही, निवडणुकीत आमचा गाफिलपणा नडला आहे. आमचा विश्वासघात झाला आहे, असे उद्विग्न होत आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘अशा घटनांनी पळून जाणारे आम्ही नाही’ असा इशारा या बैठकीत दिला. महापालिकेत राष्टÑवादीला बसलेल्या फुटीच्या धक्क्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ रविवारी नगरसेवकांच्या बैठकीत संतापले होते. फुटलेल्या दोन नगरसेवकांबाबत संताप व्यक्त करताना मुश्रीफ म्हणाले, पैशांसाठी ही मंडळी अशी वागत असतील तर कोल्हापूरची सुज्ञ जनताच त्यांची राजकीय कारकीर्द संपवेल. आज भाजप नेत्यांकडे पैसा आहे म्हणजे आम्ही दरिद्री नाही. पैशांसाठी कोण किती उद्ध्वस्त झाले हे आम्ही राजकारणात पाहिले आहे. काळ बदलत गेला तसे आम्ही गाफील राहिलो आहे. सरांनीही सारे विसरून जावे. मुरलीधर जाधव यांचाही गैरसमज दूर झाला आहे, त्यांचाही पक्ष सोडण्याचा विषय संपलेला आहे, असे मुश्रीफ म्हणाले.