शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सौरभ पाटील याला राष्ट्रपती सुवर्णपदक, तर महेश्वरी गोळे हिला कुलपती सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 16:58 IST

Shivaji University Kolhapur- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कोरोनाबाबतच्या निर्बंधामुळे यंदा प्रत्यक्षात कोणतीही पदवी या समारंभामध्ये प्रदान करण्यात आली नाही. त्याऐवजी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सौरभ पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती महेश्वरी गोळे आणि पीएच.डी.धारक बसवराज माळी, अमोल माने, मृणालिनी अहिरे, बलगोंडा पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देसौरभ पाटील याला राष्ट्रपती सुवर्णपदक, तर महेश्वरी गोळे हिला कुलपती सुवर्णपदकशिवाजी विद्यापीठाचा ऑनलाइन दीक्षांत समारंभ

कोल्हापूर :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. कोरोनाबाबतच्या निर्बंधामुळे यंदा प्रत्यक्षात कोणतीही पदवी या समारंभामध्ये प्रदान करण्यात आली नाही. त्याऐवजी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सौरभ पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती महेश्वरी गोळे आणि पीएच.डी.धारक बसवराज माळी, अमोल माने, मृणालिनी अहिरे, बलगोंडा पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे जाहीर करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातून या समारंभाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिकेंद्रित आहे. त्यात कला, संशोधन, कौशल्य, मानवी मूल्ये, सामाजिक समस्या सोडविण्याचा दृष्टिकोनाचा समावेश आहे. या धोरणामुळे शिक्षणातून उच्च दर्जाचे कौशल्य असणारे मनुष्यबळ विकसित होईल. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठण्याच्या योग्यवेळी हे धोरण आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी रोडमॅप ठरवून विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी कार्यरत होणे आवश्यक असल्याचे डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.

पदवी मिळणे ही शिक्षणाची सुरुवात असून शेवट नाही. पदवीधरांनी आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा. नोकरी मागणारे होण्याऐवजी रोजगार संधी निर्माण करणारे कसे होता येईल, यादृष्टीने पदवीधरांनी कार्यरत राहावे. प्रांतवाद, जातीभेद करू नये. आत्मनिर्भरतेची सुरुवात स्वत:पासून करावी, असे ‌आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. नॅकचे ए-प्लस प्लस मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला नवीन उपक्रमांसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, पी. आर. शेवाळे, मेघा गुळवणी, एस. एस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी पदवीधरांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्ययशील यादव, नंदिनी पाटील, तृप्ती करेकट्टी यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठuniversityविद्यापीठkolhapurकोल्हापूर