कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरच्या सौरभ पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला.
शाहू जयंतीनिमित्त ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेसाठी बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज हा विषय देण्यात आला होता. त्यात ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल प्रा. सुभाष वारे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यावेळी प्रा. सुभाष वारे यांनी वक्तृत्व कलेद्वारे वक्त्यांनी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडावी असे मत व्यक्त केले. अन्य निकाल पुढीलप्रमाणे- द्वितीय : आनंद मसलखांब (सोलापूर), तृतीय : शिवम माळकर (कोल्हापूर), उत्तेजनार्थ : संभाजी पाटील, संकेत पाटील (कोल्हापूर), सिद्धी खेडेकर (पुणे). यावेळी संस्थेचे सरचिटणीस नितीन राऊत, परीक्षक डॉ. सुभाष वाघमारे, धर्मराज चावरे, स्मिता पाटोळे, विशाल विमल, हर्षल जाधव, कृष्णात स्वाती, अनिल कांबळे, अजय भालकर, संजय भोसले उपस्थित होते.
------