शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

सतेज, पी. एन. मनोमिलनातून काँग्रेस बळकट करू

By admin | Updated: June 15, 2016 00:08 IST

पतंगराव कदम : कोल्हापुरातून सुरुवात करूया; कौलव येथे बाळासाहेब पाटील पुण्यतिथी कार्यक्रम

भोगावती : काँग्रेस पक्षाने विधायक दृष्टिकोन ठेवून विकास साधला आहे. या पक्षाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे काँग्रेस तशी संपणार नाही. म्हणून पक्ष संघटना बळकट करण्याची सुरुवात कोल्हापुरातून पी. एन. पाटील आणि आ. सतेज पाटील यांच्या मनोमिलनाने करू, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी जाहीर केले.कौलव (ता. राधानगरी) येथे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.कदम म्हणाले, बाळासाहेब पाटील हे संयमी नेतृत्व होते. सहकाराचा आज दिसणारा वटवृक्ष हा एकेकाळी कौलवकरांनी लावलेले रोपटं होतं, म्हणूनच त्यांचे विचार राज्याने स्वीकारले आहेत. बाळासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याची सुरुवात करून खणखणीत नाणं करू, असा विश्वास व्यक्त केला.माजी आ. पी. एन. पाटील म्हणाले, बाळासाहेब पाटील-कौलवकरांचे कार्य राज्याला परिचित आहे. म्हणून आज तमाम जनसागराच्या साक्षीने त्यांची पुण्यतिथी साजरी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. त्यामुळे कर्जमाफी आधी शेतसारा माफी झाली पाहिजे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने काँग्रेसमुक्त भारत करण्यापेक्षा आत्महत्यामुक्त भारत बनवावा, असा संकल्प करावा. सोनिया गांधी यांनी देशात ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. भोगावती कारखान्यावर शंभर कोटींचे कर्ज आहे म्हणणाऱ्यांनी आता २00 कोटींच्या वर कर्ज केले आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.देवयानी हलके, लक्ष्मीकांत हुंडे, रोहन पाटील, ए. डी. पाटील, महादेव पाटील व विविध स्पर्धांतील स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जि. प.चे शिक्षण व अर्थ सभापती अभिजित तायशेटे, तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, शामराव देसाई, राधानगरीचे सभापती जयसिंग खामकर, विश्वनाथ पाटील, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी संचालक विजयसिंह डोंगळे, धीरज डोंगळे, डी. आय. पाटील, उपसभापती दत्तात्रय मुळीक, विजयसिंह मोरे, शिवाजी तळेकर, एम. आर. पाटील, रमेश वारके, प्रा. ए. डी. चौगले, संभाजीराव पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक उदयसिंह पाटील-कौलवकर यांनी केले. संजय चरापले यांनी आभार मानले.(वार्ताहर)