कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या घामाला दाम व दूध उत्पादकांना न्याय मिळावा, यासाठी विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा भुदरगडचे माजी उपसभापती सत्यजित जाधव यांनी केली.
माजी आमदार दिनकरराव जाधव गटाच्या ठरावधारकांसमवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी निर्णय जाहीर केला.
‘गोकुळ’साठी सत्यजित जाधव इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्या आजरा दौऱ्यावेळी भेट घेऊन विरोधी आघाडीला पाठिंबा दिला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंत शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या जाधव गटाची भूमिका कौतुकास्पद आहे. जाधव गटाचा पाठिंबा आमच्या लढ्यास अधिक बळ देणारा असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी विश्वजीत जाधव, सुरेश हवालदार, शहाजी देसाई, कुंडलिक तळकर, शिवाजी पाटील, नामदेव ठाकूर, पांडुरंग सुतार, गणेश रावळ, विठ्ठल रेपे ,नंदकुमार जाधव, भीमराव डाकरे, श्रावण चव्हाण, धनाजी पाटील, शिवाजी गुरव उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत माजी आमदार दिनकरराव जाधव गटाने विरोधी आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्यजित जाधव यांचे स्वागत केले. (फाेटो-२६०४२०२१-काेल-गोकुळ)