शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

सतीश सूर्यवंशीची अण्णा कोळेकरवर मात

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

वाळवा कुस्ती मैदान : तासाभराच्या झुुंजीनंतरही मैदानी निकाल न झाल्याने शौकिनांची निराशा

वाळवा : गांधी तालीम मंडळ वाळवा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात मामासाहेब कुस्ती पुणेचा मल्ल सतीश सूर्यवंशी (भाटवडे) याने महावीर केसरी अण्णा कोळेकर (गंगावेस) याच्यावर ५३ व्या मिनिटास गुणावर मात करून प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये, मानाची चांदीची गदा आणि चषकाचे बक्षीस पटकाविले.प्रथम क्रमांकाची कुस्ती मल्ल सतीश सूर्यवंशी विरुद्ध अण्णा कोळेकर यांच्यात झाली. दोन्ही मल्ल बलदंड होते, परंतु त्यांनी गर्दनखेच, मान व मनगटाची ताकद अजमाविणे, चुकून पट काढण्याचा पोकळ प्रयत्न करणे, यातच आपला तब्बल एक तास वाया घालविला. कुस्ती शौकिनांची या कुस्तीने घोर निराशा झाली. शेवटी ५३ व्या मिनिटास मल्ल सूर्यवंशीला गुणांवर विजयी घोषित करण्यात आले.सतीश सूर्यवंशी याला खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार, सरपंच गौरव नायकवडी, कुस्ती कमिटी अध्यक्ष गणपती साळुंखे, माजी उपसरपंच नंदू पाटील, हुतात्मा साखरचे संचालक सुरेश होरे, कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव थोरात, संजय अहिर, श्याम कदम यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठीची पहिली कुस्ती न्यू मोतीबाग तालीम, कोल्हापूरचा मल्ल संभाजी कळसे विरुद्ध भोसले तालीम सांगलीचा रामदास पवार यांच्यात झाली. सांगलीच्या रामदास पवार याने गुणांवर मात करून ती जिंकली. त्याला हुतात्मा दूध संघ, वाळवा अध्यक्ष भगवान पाटील पुरस्कृत ७५ हजारांचे बक्षीस व मानाची चांदीची गदा व कायम चषक देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकासाठीची दुसरी कुस्ती न्यू मोतीबाग तालीम, कोल्हापूरचा मल्ल प्रशांत शिंदे विरुद्ध शाहूपुरी कोल्हापूरचाच राहुल सरक यांच्यात झाली. ४५ मिनिटांनी ती बरोबरीत सोडविण्यात आली.तृतीय क्रमांकाची कुस्ती गांधी तालीम, वाळव्याचा मल्ल सुजित नवले विरुद्ध भोसले व्यायामशाळा सांगलीचा सुदेश ठाकूर यांच्यात झाली. यात सहाव्या मिनिटालाच हात काढून घिस्सा डावावर सुजित नवलेने सुदेश ठाकूरला चितपट केले. त्याला किसान नं. ३ सहकारी पाणीपुरवठा पुरस्कृत बक्षीस ३५ हजार रुपये अध्यक्ष सावकर दादा कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच रघुनाथ मेटकरी यांच्याकडून चांदीची कायम गदाही देण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल अजय निकम (रेड) विरुद्ध शाहूपुरी, कोल्हापूरचा पप्पू माने यांच्यात झाली. यात अजय निकम याने पप्पू मानेस चितपट केले व स्वातंत्र्यसैनिक विलासराव थोरात (आबाजी) वाळवा सहकारी दूध संस्था वाळवा पुरस्कृत रोख २५ हजारांचे बक्षीस मिळविले.प्रारंभी दुपारी तीन वाजता जैनुद्दीन पिरजादे यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. यावेळी राम सारंग, विकास पाटील, प्रकाश पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन कुंडलिक गायकवाड, संजय खोत, सुहास माने, नंदू पाटील, हणमंत जाधव (सांगली), अशोक नागराळे (शाहूपुरी, कोल्हापूर), संपत जाधव (चिंचोली), संभाजी पाटील (कुडित्रे), गणपती साळुंखे, शंकर आप्पा थोरात, मोहन सव्वाशे, बाळासाहेब पाटील, पांडुरंग अहिर, बाळासाहेब तांदळेकर उपस्थित होते. (वार्ताहर)मल्ल शिवानी खोत विरुद्ध संजना बागडी (तुंग) यांच्यात एकमेव महिलांची कुस्ती झाली. त्यात शिवानी खोत हिने विजयी पताका या मैदानात फडकविली.