शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सातारा -- चक्का जाम!

By admin | Updated: January 31, 2017 23:37 IST

मराठा समाज रस्त्यावर : जिल्ह्यात तीसहून अधिक ठिकाणी आंदोलन

सातारा : ‘मराठा क्रांती मोर्चा’तून आपली ताकद दाखवून देणाऱ्या मराठा बांधवांनी मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या एकीचे दर्शन घडविले. जिल्ह्यात तब्बल तीस ठिकाणी अत्यंत शांततेत अन् संयमाने ‘चक्का जाम’ आंदोलन यशस्वी झाले. या काळात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गासह सारेच रस्ते पूर्णपणे ठप्प झाले होते.चक्का जाम आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार होते; परंतु तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासूनच घरातून बाहेर पडले होते. मिळेल त्या वाहनांनी ते नियोजित आंदोलनस्थळी जमा होत होते. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ, खंडाळा-पारगाव चौक, आणेवाडी टोल नाका, साताऱ्यातील वाढे फाटा, उंब्रजमध्ये तळबीड टोल नाका, कऱ्हाडला कोल्हापूर नाका येथे सुमारे तीन तास आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शेकडो वाहनांची चाकं जाग्यावर थांबली होती. महामार्गाच्या इतिहासात बहुधा प्रथमच इतका जास्त काळ आंदोलन झाले; परंतु कोठेही गोंधळ पाहायला मिळाला नाही. तसेच दहिवडीत पिंगळी चौक, पुसेगावमध्ये शिवाजी चौक, कोरेगावात आझाद चौक, रहिमतपूर, फलटण, लोणंदमध्ये बसस्थानकासमोर, वाठार, मेढ्यातील-बाजार चौक, पाटणमधील जुने स्टँड, वाईतील बावधन नाका, म्हसवड, डिस्कळ- शिवाजी चौक, वडूजचा शिवाजी चौक, कातरखटावला कात्रेश्वर चौक, मायणी-चांदणी चौक, विखळे फाटा-शिवाजी चौक, पुसेसावळी-दत्त चौक, चौकीचा आंबा-प्रतापराव गुजर चौक येथे आंदोलन करण्यात आले. सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)रुग्णवाहिकेसाठीआंदोलनकर्ते पांगलेवाढे फाटा, उंब्रज येथे आंदोलन सुरू असताना अचानक एक रुग्णवाहिका तेथे आली. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्वयंशिस्तीने महामार्गावरून बाजूला होत गर्दीतून रुग्णवाहिकेसाठी स्वत:हून रस्ता काढून देण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढे फाटा येथे मंगळवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शेकडो समाजबांधवांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.