शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सासू-सुनांची रंगली मैत्रीपूर्ण जुगलबंदी

By admin | Updated: December 23, 2015 01:24 IST

‘कलर्स’, लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘सासू-सून जोडी नं.१’ ला प्रतिसाद; कुलकर्णी, माने, उपासे, राऊत, सुतार विजयी

कोल्हापूर : लोकमत ‘सखी मंच’ आणि ‘कलर्स’ प्रस्तुत ‘सासू-सून जोडी नंबर १’ या सासू-सुनांतील नात्यांचे पदर व अंतरंग उलगडून दाखविणाऱ्या स्पर्धेला सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त आयोजित स्पर्धेत विद्या व अनुष्का कुलकर्णी, अरुणा-सविता माने, अरुणा आणि जयश्री उपासे, शोभा आणि समृद्धी राऊत, कल्पना आणि लक्ष्मी सुतार या जोड्यांनी अव्वल यश मिळविले. या स्पर्धेत एकूण आठ सासू-सुनेच्या जोड्यांनी भाग घेतला होता. पहिल्या फेरीत खेळीमेळीच्या वातावरणात कवितांच्या माध्यमातून सासूंनी सुनांची ओळख करून दिली, तर दुसऱ्या फेरीत ‘मॅचिंग राऊंड’ झाला. त्यामध्ये अगदी कर्णफुलापासून चप्पल, पर्स, साडी आदींचे एकसारखे मॅचिंग सासू-सुनांनी केले होते. तिसऱ्या फेरीत सासू आणि सुना किती बुद्धिमान आहेत, त्याची चुणूक व्यासपीठावर दाखविण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार अनेकांनी आपल्यातील सुप्त बुद्धिमत्तेचे प्रदर्शन घडविले. चौथी फेरी परीक्षक राऊंड म्हणून घेण्यात आली. त्यामध्ये सासू-सुनांच्या मनातील भाव समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांची पातळी किती प्रलग्भ आहे, याची जणू परीक्षा घेणारीच ठरली. सासू-सुनेच्या नातेसंबंधात अनेक पैलू असतात. सासू म्हणजे कजागच तर सुनाही काही कमी नसतात, अशा सासू-सुनेच्या भांडखोर छटा छोट्या पडद्याद्वारे आणि चित्रपटांतून दाखविल्या जात असल्या तरी सासू कधी आई असते, बहिणीसारखी साथ देणारी असते. नव्या जमान्यात तर आई-मुलीसारखे नाते असणाऱ्या सासू-सुनेच्या जोड्याही पाहायला मिळतात. याच सगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखविणाऱ्या ‘सासू-सून जोडी नं. १’ या कार्यक्रमातून शनिवारी व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात उपस्थित सखींना सासू-सुनांच्या नात्यातील छटा पाहण्यास मिळाल्या. जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनेल ‘कलर्स’ व स्त्रियांच्या कला-गुणांना व्यासपीठ देणारे हक्काचे व्यासपीठ लोकमत ‘सखी मंच’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून नात्यातील अनेक रंगांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविणारा ‘सासू-सून जोडी नं. १’ हा कार्यक्रम म्हणजे सासू-सुनांच्या नात्यातला दुवा ठरला. या कार्यक्रमाचे उद्घाटन बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या सुविद्य पत्नी शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. वारणा वडगावकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. या स्पर्धेचे परीक्षण अ‍ॅड. गीता भूमकर, चाटे स्कूलच्या प्राचार्या ऋचा कुलकर्णी यांनी केले, तर स्पर्धेचा बक्षीस समारंभ परीक्षकांच्या हस्ते झाला. (प्रतिनिधी)आठ जोड्यांचा सहभाग विद्या-अनुष्का कुलकर्णी, अरुणा-सविता माने, कल्पना-लक्ष्मी सुतार, अक्षता-वैशाली शहा, अश्विनी-शीला हंजे, अरुणा-तेजश्री उपासे, समृद्धी-शोभा राऊत, हौसाबाई-प्रतीक्षा वंदुरे-पाटील या जोड्यांनी भाग घेतला होता. त्यात कुलकर्णी, माने, सुतार, उपासे, राऊत यांनी बाजी मारली. ‘डी डान्स झोन’च्या कलाविष्काराची झालर विशाल पाटील यांच्या ‘डी डान्स झोन’चे मेघा माळी, प्रीती काशीद, अमृता चेचर, आम्रपाली कांबळे, करिश्मा चिरमुरे, अमोल तावरे, नीलेश शिंदे, अक्षय जाधव, प्रकाश माने, देवानंद सुतके यांनी हिंदी-मराठी गाण्यांवर ‘नटरंग’, ‘शेतकरी नृत्य’, ‘ढिपांगी ढिपांग...’ , ‘नवरी माझी लाडाची लाडाची गं...’ ‘जोगवा’, ‘वाजले की बारा...’ या गीतांवर नृत्ये सादर करत सखींना डोलावयास भाग पाडले. लकी ड्रॉद्वारे पैठणीकार्यक्रमानिमित्त सर्व सखींमधून जमा केलेल्या कुपनमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये सखी पद्मा बहिरशेट या पैठणीच्या विजेत्या ठरल्या. बहिरशेट यांना परीक्षक अ‍ॅड. गीता भूमकर यांच्या हस्ते पैठणी देण्यात आली.