शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोव्हेंबरला पुण्यात सरपंचांचे अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:40 IST

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पंचायत राज विकास मंच सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ...

गडहिंग्लज : विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांनाही मतदानाचा अधिकार मिळावा यासह ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यासंदर्भात चर्चा आणि त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या लढ्याचा कृती कार्यक्रम ठरविण्यासाठी येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय पंचायत राज विकास मंच सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.गडहिंग्लज तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष उदय चव्हाण होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या विविध अडचणीबाबत चर्चा झाली. अधिवेशनातील मागण्यासंदर्भातील मुद्याचे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष पाटील संघटनेतर्फे देण्यात आले.पाटील म्हणाले, सरपंचांच्या मासिक मानधनासह ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांसाठी संघटना मजबूत करण्याची गरज आहे. त्याचा सविस्तर ऊहोपाह अधिवेशनात होईल. ‘सरपंच मासिका’चे प्रकाशनही अधिवेशनात करण्यात येईल.चव्हाण म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातील निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शन आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीचे नियोजन यासह विधान परिषद निवडणुकीतील मतदानाच्या हक्कासाठी राज्यव्यापी संघटना आणि लढाईची गरज आहे.बैठकीस शिवाजी राऊत (शेंद्री), सतीश कोळेकर (बड्याचीवाडी), प्रवीण माळी (करंबळी), रवींद्र घेज्जी (माद्याळ), सुजित देसाई (इंचनाळ), विजयकुमार भुरगुडा (लिंगनूर काा नूल), विजय मोहिते (अत्याळ), बसवराज हिरेमठ (भडगाव), रोहिदास चौगुले (दुगूनवाडी), आशिष साखरे (नेसरी), अरुण मिरजे (हेब्बाळ काा नूल), रेखा जाधव (कौलगे), मारुती कोकितकर (वाघराळी), बाळय्या स्वामी (मुगळी), रोहिणी पाटील (बेकनाळ), गौरी लोंढे (जरळी), आदी उपस्थित होते.सरपंच संघटनेच्या मागण्या अशा..संगणक आॅपरेटर नेमण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला द्यावा, १४ व्या वित्त आयोगातील राखीव निधी केवळ विकासकामावरच खर्ची पडावा, ‘महावितरण’कडून आकारण्यात येणारी ‘पॉवर फॅक्टर पेनाल्टी’ रद्द व्हावी, पथदिव्यांचे लाईटबिल शासनाने द्यावे आणि विद्युत खांबांचे भाडे ग्रामपंचायतीस मिळावे, विधान परिषदेत सरपंचांचा स्वतंत्र प्रतिनिधी असावा, सरपंचांना मासिक २५ हजार मासिक मानधन मिळावे.