शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच मानधनवाढीची अंमलबजावणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:10 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार ० ते २००० लोकसंख्येच्या ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरपंचांची मानधनवाढ आणि सदस्यांना बैठकीसाठीचा भत्ता वाढविण्याच्या ६ सप्टेंबर २०१४ रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. आदेश निघूनही साडेतीन वर्षे झाली तरी या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील २७ जुलै २००९ च्या शासन निर्णयानुसार ० ते २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, २००१ ते ८००० लोकसंख्या असणाºया गावांच्या सरपंचांना ६०० रुपये आणि ८००१ पेक्षा जास्त लोकसंख्या असणाºया गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते. यातील ७५ टक्के खर्च शासन करते; तर २५ टक्के खर्च संबंधित ग्रामपंचायतींकडून केला जातो.याच आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिबैठक २५ रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आदेशानुसारच सध्या मानधन आणि बैठक भत्ता दिला जातो. भत्त्याचा १०० टक्के खर्च शासनाकडून दिला जातो. हे मानधन आणि बैठक भत्ता अतिशय अल्प असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची सातत्याने मागणी होत होती. सरपंचांच्या मेळाव्यांमधूनही यासाठी पाठपुरावा सुरू होता.याची दखल घेत ६ सप्टेंबर २०१४ रोजीच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय क्र. : व्हीपीएम/२०११/प्र.क्र. ४०/पंरा-३ नुसार सरपंचांचे मानधन आणि बैठक भत्ता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला; तर या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांना प्रतिबैठक २०० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या आदेशाची पुढील प्रशासकीय प्रक्रिया केली न गेल्याने अजूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. विधानमंडळाची मंजुरी, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद यांपैकी काहीही न झाल्याने जुन्याच दराने सरपंचांना मानधन मिळत असून सदस्यांनाही जुन्याच दराने बैठकीचा भत्ता मिळत आहे.एका जेवणाला मानधन पुरत नाहीशासन सरपंच आणि सदस्यांची एक प्रकारे थट्टाच करीत असल्यासारखी परिस्थिती आहे. एखाद्या कामासाठी जिल्हा परिषदेला जायचे म्हटले तरी भाड्याचा आणि जेवणाचा खर्च हजार रुपयांच्या घरात जात असताना महिन्याला सरपंचांना ८०० रुपये मानधन देणे अव्यवहार्य असल्याची प्रतिक्रिया अनेक सरपंच व्यक्त करीत आहेत. सर्व सदस्यांना घेऊन नाष्ट्याला गेले तरी हे मानधन पुरणारे नाही आणि आमच्याकडून ग्रामविकासाच्या भल्या मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. मात्र आमच्याकडे शासनाचे लक्ष नाही, अशी खंतही अनेक सरपंचांनी व्यक्त केली.