शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संजय साडविलकर यांनी अवैध शस्त्रे आणली कुठून - समीर गायकवाडची पोलिसांत तक्रार-‘एसआयटी’ करणार तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 18:38 IST

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजय अरुण साडविलकर हे साक्षीदार आहेत. ते अवैध गावठी पिस्तुल, रिव्हॉल्व्हर शस्त्र खरेदी-विक्री व त्यांची दुरूस्तीचा व्यवसाय करीत होते. हा गुन्हा असून त्यांनी अवैध शस्त्रे आणली कुठून, ती कोणाला विक्री केली, कुणाकडून खरेदी केली. त्यातून गुन्हे घडले किती याची सखोल चौकशी करावी, अशी तक्रार संशयित आरोपी समीर गायकवाड याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी केली. या तक्रार अर्जानुसार पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (एसआयटी) करणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.

समीरने दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, पानसरे व दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी मुख्य साक्षीदार संजय साडविलकर यांची ‘इन कॅमेरा’ साक्ष न्यायालयात झाली. त्यामध्ये माझ्याकडे कुठलाही जगण्यासाठी व्यवसाय नसल्याने मी सन १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या कालावधीत गावठी पिस्तुल खरेदी-विक्रीचा व्यवसाय केला आहे, अशी कबुली दिली होती. न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्राची एक प्रत मला मिळाली होती. ती वाचल्यानंतर ही बाब मला खटकत होती. शस्त्रे विकून किती गुन्हे घडले असतील, त्याचा काय परिणाम झाला असेल. त्यानुसार वकिलांचा सल्ला घेऊन साडविलकर यांच्याविरोधात तक्रार दिली असून सखोल चौकशी व्हावी. यावेळी त्याच्यासोबत अ‍ॅड. समीर पटवर्धन, अ‍ॅड. श्रीपाद होमकर, आशाताई पोतदार, किरण कुलकर्णी, दिलीप पाटील, किशोर घाटगे, शिवाजीराव ससे, सुनील पाटील, सुधाकर सुतार, बाळासाहेब निगवेकर आदी उपस्थित होते.साक्षीदारांवर दबावाचा हेतू नाहीसाक्षीदार साडविलकर यांनी सीबीआय आणि एसआयटीच्या चौकशीमध्ये न्यायालयात शस्त्र खरेदी-विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करत असल्याची स्वत: कबुली दिली आहे असे असताना त्यांच्यावर तक्रार देणे कितपत योग्य आहे. एकप्रकारे साक्षीदारावर दबाब निर्माण करण्याचे तुमचे नियोजन आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी समीरला केला. त्यावर पानसरे हत्येचा माझ्यावर आरोप असला तरी शस्त्रे विकणे आणि खरेदी करणे हा गुन्हा आहे. साक्षीदार व पोलिसांवर दबाव आणण्याचा कोणताही हेतू नाही.पानसरे हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड याने मंगळवारी साक्षीदार संजय साडविलकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. यावेळी सोबत अ‍ॅड. समीर पटवर्धन व कार्यकर्ते.