कोल्हापूर : राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी संजय पाटील (कोल्हापूर), सीमा नरेंद्रसिंग परदेशी (सातारा), वर्षा संजय घाटगे (नागपूर) यांची नियुक्ती झाली आहे, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पाटील म्हणाले, ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम ७ व ८ नुसार ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी तसेच परिणामकारक काम होण्यासाठी राज्य परिषदेवर अशासकीय सदस्यांची निवड केली जाते. यासाठी आठ महिन्यांपूर्वी सूचना प्रसिद्ध करून राज्यातून अर्ज मागविले होते. ही प्रक्रिया आठ महिने सुरू होती. पारदर्शकपणे या निवडी झाल्या आहेत. प्रवर्गनिहाय किती व्यक्ती घ्यायच्या हे नक्की करण्यात आले होते. त्यानुसार ग्राहक हिताशी संबंधित पाच व्यक्ती महाराष्ट्रातून घेण्यात आल्या असून, आपली निवड या प्रवर्गातून झाली आहे. या परिषदेचा कालावधी तीन वर्षांसाठी निश्चित केला असून, राज्यपालांच्या आदेशाने ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव उ. द. वाळुंज यांनी ही नियुक्ती केली आहे.
‘राज्य ग्राहक संरक्षण’च्या सदस्यपदी संजय पाटील
By admin | Updated: September 7, 2014 00:58 IST