शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांना संजय घाटगे गटाचा पाठिंबा, व्हनाळीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

By विश्वास पाटील | Updated: March 26, 2024 13:40 IST

'शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्क्याने विजय करण्याचा निर्धार' 

कोल्हापूर : सध्याच्या बदललेल्या राजकीय समिकरणांचा आणि परिस्थितीचा विचार करता कागलचे माजी आमदार संजय घाटगे गटाचा राजकीय विरोधक ठरला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही काम करू आणि शाहू छत्रपती यांना प्रचंड मताधिक्क्याने विजय करू असा निर्धार व्हनाळी (ता.कागल) येथील संजय घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आज, मंगळवारी घेण्यात आला.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थावरून बोलताना संजय घाटगे म्हणाले, आम्ही राजकारणात कोणावर विनाकारण पलटवार केले नाहीत. आणि कोणापुढेही गुडघेदेखील टेकले नाहीत. आम्ही घेतलेला निर्णय ठाम असून शाहू महाराजांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात सकारात्मक राजकारणाची नांदी होईल...त्यामुळे खंत नाहीमला सेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड प्रयत्न केले, परंतू पक्षप्रमुख ठाकरे यांनी शाहूंच्या गादीचा मान राखण्यासाठी ही जागा काँग्रेसला सोडली, त्यामुळे त्याची खंत नाही. निष्ठावंत कार्यकर्तेच आमचे भागभांडवल आहेत. त्यामुळे नेटाने कामाला लागू.गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, आमचा राजकिय शत्रू कोण हे आता जवळजवळ ठरलेलं आहे. त्यामुळे ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही शाहू महाराजांच्याच पाठीशी राहू. जिल्हाचा खासदार ठरविण्याची ताकद संजय घाटगे गटात आहे. ती ताकद या निवडणुकीत आम्ही दाखवून देऊ.यावेळी विजय जाधव, वैभव आडके, आनंदा भिऊंगडे, दिलीप चौगले, बाबूराव शेवाळे, विलास पाटील, संभाजी भोकरे, जयसिंग टिकले, युवराज कोईगडे, अशोक पाटील, मुकुंद बोडके, मल्हारी पाटील, के.के.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.  कार्यक्रमास दिनकर पाटील, आनंदा साठे, ए.वाय पाटील, रणजित मुडूकशिवाले, सिद्रमा गंगाधरे, एम.बी.पाटील, धनाजी गोधडे, विलास पोवार, शिवगोंड पाटील, आल्लाबक्ष शहाणेदिवाण यांच्यासह शिवसैनिक, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती